प्रतिनिधी: बाळासाहेब जाधव
सोमवार दिनांक 10/03/2025 रोजी सरदवाडी येथे केंद्र पुरस्कृत पंधरावा वित्त आयोग निधी मधून महिला व मुलांचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजन करण्यात आले.सरदवाडी येथील विठ्ठल मंदिर या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीदेवी व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करून करण्यात आली.शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संदेशजी केंजळे, रामलिंग व बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा राणीताई कर्डिले व सरदवाडी गावच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ. लक्ष्मीताई जाधव यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील मुले व अंगणवाडीतील लहान मुलांची तसेच गावातील महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश जी केंजळे होते. कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शितोळे मॅडम व सर्व स्टाफ उपस्थित होता. अंगणवाडी सेविका मीरा घावटे लिलाबाई सरोदे व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हिरामण सरोदे उपाध्यक्ष कैलास सरोदे शिवसेना विभाग प्रमुख पंकज दादा शेळके उपसरपंच सोमनाथ सरोदे ग्रामपंचायत सदस्य उमेश सरोदे माजी उपसरपंच कृष्णा सरोदे, माजी उपसरपंच गणेश सरोदे, विद्याताई सरोदे,थोपटे मॅडम व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प रामभाऊ महाराज सरोदे यांनी केले तर आभार सरदवाडी गावचे ग्राम आदर्श ग्रामपंचायत अधिकारी बाळासाहेब बेंद्रे यांनी मानले