गोलेगाव प्रतिनिधी: चेतन पडवळ

ता.९ शिरूर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत आज पाच जागेसाठी निवडणूक झाली असून या पाचही जागेवर महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने बाजी मारली असून, खरेदी विक्री संघाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत नक्की सत्ता कोणाची हे सिद्ध होणार आहे.

खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार अशोक पवार यांनी लक्ष घातल्याने पाचही जागेवर त्यांचे उमेदवार निवडून आले आहे. वडगाव रासाई गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची सुरेशराव ढवळे व शरद साठे यांच्यात काटे की टक्कर होऊन केवळ एकमताने ढवळे विजयी झाले आहे, तर मांडवगण फराटा गटामध्ये बाळासाहेब नागवडे एक मताने विजयी झाले आहे. शांततेत पार पडलेली ही निवडणूक ९ मार्च सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी अरुण साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी महायुती व महाविकास आघाडी दोन्हींच्या नेत्यांनी आपले उमेदवार निवडून येण्यासाठी सकाळपासूनच निवडणूक केंद्र शिरूर नगरपरिषद सेंटर शाळा येथे थांड मानले होते. मतदारांना नेण्यासाठी शिरूर तालुक्यातील सर्वात भागातून उमेदवारांनी वाहनांची व्यवस्था व खातेदारी केल्याचे दिसून येत होते.

ही निवडणूक पहिल्या टप्प्यात बारा जागेवर बिनविरोध झाली होती त्यात महायुतीने दहा जागेवर आपला हक्क सांगितला होता तर महाविकास आघाडीचे माजी आमदार अशोक पवार यांचे दोन उमेदवार बिनविरोध झाल्याचे बोलले जात होते. आज झालेल्या निवडणुकीत पाचही जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यांनी पाचही जागेवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीनंतर माजी आमदार अशोक पवार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की बिनविरोध झालेल्यांपैकी अनेक जण यांनी माला विधानसभा निवडणुकीमध्ये सहकार्य केले होते ते माझे सहकारीच आहेत. व आज निवडून आलेले पाचही उमेदवार माझ्याच पक्षाचे व महाविकास आघाडीचे आहे. हा विजय माझा नसून बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीत असल्याचे माजी आमदार अशोक पवार यांनी सांगितले.

आज निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार व त्यांना पडलेली मते पुढील प्रमाणे सोसायटी मतदार संघ अ वर्ग मांडवगण फराटा गट बाळासाहेब अर्जुनराव नागवडे १४ मते विजयी वडगाव रासाई गट सुरेशचंद्र मारुतराव ढवळे ११ मते विजयी टाकळी हाजी गट महेंद्र सुरेश पाचर्णे १९मते विजयी, यांच्यामध्ये लढत होणार आहे. वैयक्तिक सभासद मतदारसंघ नवनाथ सुभाष ढमढेरे १११५ मते विजयी, सर्जेराव दसगुडे ११३१ मते विजयी. बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढील प्रमाणे कारेगाव गट राहुल उर्फ किसनराव आनंदराव गवारे, न्हावरा गट नामदेव जयवंत गिरमकर, पाबळ गट लहू बाळासाहेब थोरात, रांजणगाव गणपती गट राजेंद्र उत्तम नरवडे, तळेगाव ढमढेरे गट गुलाब बबन सातपुते, शिक्रापूर गट बाळासाहेब माणिकराव टेमगिरे, धामारी गट कानिफनाथ दादाभाऊ भरणे, अनुचित जाती-जमाती राखीव गट – विवेक उत्तमराव सोनवणे, महिला प्रतिनिधी – मनीषा सुनील शेलार, सुजाता राजेंद्र नरवडे. इतर मागासवर्गीय प्रतिनिधी – संभाजी काळुराम भुजबळ भटक्या विमुक्त जाती – शरद वसंत कालेवार या बारा जागेवर बिनविरोध निवड झाली आहे.

यावेळी आघाडीचे माजी आमदार अशोक पवार गटाने जल्लोश केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष विश्वास काका ढमढेरे, पोपट दसगुडे, मुजफ्फर कुरेशी, संजय देशमुख, हाफीज बागवान, राहील शेख व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.उपस्थित होते.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button