जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर
अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूरमध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या ८२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय सेवायोजना विभागाच्या वतीने रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले अशी माहिती महाविद्यालय चे प्राचार्य डॉ.अभय खंडागळे यांनी दिली.
ओतूर महाविद्यालयामध्ये संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मेरी माटी मेरा देश या विषयावरील रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.सदर रांगोळी स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील ७२ विद्यार्थ्यांनी भाग घेतला.सदर रांगोळी स्पर्धेचे परीक्षण डॉ रोहीणी मदने व प्रा.सुर्वे मिरा यांनी केले.सदर स्पर्धेमध्ये शिंदे मुक्ता व ठोंगीरे पायल यांनी प्रथम क्रमांक,भिताडे वैष्णवी व पवार सुरेखा तसेच अनुष्का डोंगरे व प्रणाली ढेरे यांनी द्वितीय क्रमांक तर शिरसाट अमृता व सूर्यवंशी श्रावणी यांनी तृतीय क्रमांक संपादित केला.तसेच दामिनी जाधव व वृषाली कवठे, वृषाली नलावडे व अनिशा कुटे,कुलवडे कल्याणी व मोरे साक्षी यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला.
रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अभय खंडागळे यांच्या हस्ते करण्यात आले.सदर प्रसंगी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थापक अध्यक्ष कै.बाबुरावजी घोलप साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. रांगोळी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयामध्ये उपप्राचार्य डॉ व्ही एम शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले डॉ शिंदे यांनी आपल्या मनोगतामध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या स्थापनेमुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील असंख्य बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी निर्माण झाली त्यामुळे ख-या अर्थानं ग्रामीण विद्यार्थ्यांचा आयुष्य प्रकाशमय झाले असेही मत व्यक्त केले .
सदर कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ के डी सोनावणे, डॉ डी एम टिळेकर, डॉ व्ही वाय गावडे, डॉ आर एन कसपटे, डॉ ए के लोंढे, डॉ एस आर गव्हाळे, डॉ एन एन उगले, डॉ एस बी वाळके आदी मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.अमोल बिबे, डॉ.निलेश काळे, यांनी विशेष परिश्रम घेतले.