प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग, पंचायत समिती शिरुर,शिरूर तालुका मुख्याध्यापक संघ, चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरुर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ व २८ डिसेंबर रोजी चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरुर येथे झालेल्या ५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सणसवाडी ता. शिरूर जि. पुणे येथील विज्ञान शिक्षक संभाजी तबाजी ठुबे यांनी सादर केलेल्या ध्वनी या शैक्षणिक साहित्याने प्रथम क्रमांक पटकावला.जिल्हा स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात हे साहित्य सहभागी होणार आहे.विद्यार्थ्यांना कठीण वाटणारा विज्ञान विषय अत्यंत मनोरंजक पद्धतीने व प्रत्यक्ष कृतीतून शिकण्यासाठी ठुबे यांनी तयार केलेले शैक्षणिक साहित्य अत्यंत उपयुक्त असून दैनंदिन अध्यापनात शिक्षकांनी सहज उपलब्ध होणाऱ्या अशा साहित्याचा वापर शिक्षकांनी अध्यापनात केला तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विज्ञान विषयाविषयी असणारा न्यूनगंड दूर होण्यास निश्चितच मदत होणार आहे.जेष्ठ शास्त्रज्ञ अनिल लचके,चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य के. सी. मोहिते,पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर,विस्तार अधिकारी किसन खोडदे,शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेनके,सचिव मारुती कदम व इतर मान्यवरांच्या हस्ते नुकतेच ठुबे यांना प्रशस्तीपत्रक,सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.तालुका स्तरावर मिळविलेल्या या यशाबद्दल श्री नरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ,सणसवाडीचे अध्यक्ष आनंदराव हरगुडे,सचिव बाबासाहेब साठे व सर्व संचालक मंडळ,सणसवाडीच्या सरपंच रुपाली दरेकर,उपसरपंच राजूअण्णा दरेकर व विद्यालयाच्या प्राचार्या राधिका मेंगवडे,माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष पर्यवेक्षक अशोकराव दरेकर, यांनी अभिनंदन केले.