**शिरूर तालुका प्रतिनिधी :शकील मनियार
स्वाभिमानी मराठा महासंघाची व्याप्ती संपूर्ण भारत देशामध्ये आहे हे एक अराजकीय संघटन आहे लवकरच पंढरपूर येथे संपुर्ण भारत देशातील पदाधिकारी यांची महासंवाद बैठक संपन्न होणार आहे त्या अनुषंगाने संस्थापक डॉ.कृषिराज टकले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष निलेश धुमाळ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे पुर्वतयारी आढावा बैठक संपन्न झाली , संपूर्ण भारत देशातील पदाधिकारी महा संवाद बैठकीच्या निमित्ताने येणार असल्याने नियोजनात्मक आराखडा तयार करण्यासाठी सर्व पदाधिकारी यांची मते जाणून घेवून नियोजन करण्यात आले आहे बैठकीच्या निमित्ताने ओमराजे निंबाळकर, , अनिता पाटील,अमृत पठारे , ज्योती सातव, शंभुप्रिया जांभळे,सिता जाधव ,वंदना घोलप, वैशाली बहिरट,सुमन वाळुंज,मीरा शिंदे, दिपाली पाटील, शितलकुमार गाजरे ,लहु सातपुते,सतिश भोरडे, ज्ञानेश्वर गायकवाड श्रीकांत हारदे ई.पदाधिकारी उपस्थित होते.