प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न काळ म्हणजे एक पर्व च असते. त्याला अविस्मरणीय आठवण करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करत असतो.लग्नाच्या पारंपरिक विधी व्यतिरिक्त गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने साकारणे आणि त्यामागील वेगळेपण जपणे हेच त्या विवाह सोहळ्याचे आकर्षण होते.तसे पाहिले तर प्रत्येकाचे आयुष्य हे रिकामे पुस्तक असते आणि आपण जे आयुष्य जगतो ते त्यात लिहिले जाते.हीच संकल्पना घेऊन एका इंजिनियरिंगच्या प्राध्यापकाने केलेली रिसर्च पेपर पत्रिका चर्चेचा विषय ठरला आहे. संशोधन क्षेत्रातील शोधनिबंध हा आपल्या आयुष्य सारखा रिकामा असतो. संशोधन करणारा त्यात त्याचे संशोधन मांडत असतो. आपल्या आयुष्याचे पण असेच आहे आपण आपले प्राण ओतून आयुष्यात रंग भरत असतो. ही पत्रिका त्याच आधारावर तयार करण्यात आली आहे.तुषार वामन काफरे व निकिता नवनाथ जेजुरकर येत्या 22 डिसेंबर ला विवाहबद्ध होत आहेत. त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.