शिरूर तालुका प्रतिनिधी: शकील मनियार
ग्राहक पंचायत संस्था पुणे जिल्हा, या संस्थेचे राज्य अध्यक्ष अशोक भोरडे व राज्य संघटक जनार्दन पांढरमीशे यांनी संस्थेच्या शिरुर तालुका कार्यकारिणीची नुकतीच निवड जाहीर केली,२४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो.या दिनाच्या औचित्याने शिरुर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अरुणकुमार मोटे (अध्यक्ष ), साहेबराव लोखंडे (उपाध्यक्ष),उध्दव जाधव (सचिव),शौकत शेख (सहसचिव)गणेश भुजबळ (संघटक)बापूसाहेब शिवले (सहसंघटक),योगेश शेडगे(प्रसिध्दी प्रमुख)कार्यकारी सदस्य आबासाहेब थोरात,गोपाळराव भुजबळ,अतुल पाचुंदकर,वैभव शेलार यांची निवड झाली.ग्राहक पंचायत ही ग्राहकांच्या न्याय हक्कासाठी झटणारी चळवळ आहे. ग्राहक शोषण मुक्तीचे स्वप्न उराशी बाळगून त्या दिशेने वाटचाल करताना कोणत्याही धर्माच्या, व्यक्तीच्या,पक्षाच्या विरुद्ध काम केले जात नाही.शिरूर तालुक्यामध्ये ग्राहकांच्या हक्कासाठी अनेक वेळा शासकीय कार्यालयाशी पत्र व्यवहार केलेले आहेत.समन्वय मार्गाने प्रश्न सोडवण्यासाठी शोषणमुक्त ग्राहक हे ग्राहक पंचायतीचे ध्येय आहे. दुय्यम निबंधक,रेशनिंग,महावितरण,तहसील कार्यालय,तलाठी कार्यालय , पाटबंधारे,पंचायत समिती इत्यादी ठिकाणी नागरिकांची कोणत्या ना कोणत्या कारणाने फसवणूक आणि लूट होत असते.ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने शिरूर तालुक्यामध्ये ग्राहक पंचायत चळवळ करणार असल्याची माहिती नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष अरुणकुमार मोटे यांनी सांगितले, तालुक्यात संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती उपाध्यक्ष साहेबराव लोखडे यांनी दिली.बेट भागातील नावाजलेल्या विविध दैनिकांच्या या निर्भीड पत्रकारांची निवड झाल्याने नागरिकान कडून शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.