शिरूर तालुका प्रतिनिधी: शकील मनियार

दिनांक ४डिसेंबर २०२४रोजी क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित खिंवसरा पाटील शिक्षण संकुल थेरगाव या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा रामकृष्ण मोरे सभागृह चिंचवड येथे संपन्न झाला. सकाळी ठीक १०.३० वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली भारत माता ,सरस्वती माता व क्रांतिवीर चापेकर बंधू यांचे प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन प्रमुख पाहुणे कार्यकारणी सदस्य व सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु या नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

बालवाडी विभागातून ओ माय फ्रेंड गणेशा ,गोरी गोरी पान, आशा विविध गाण्यांवर बालचमूहाने खूप सुंदर नृत्य सादर केले. प्राथमिक विभागामधून गलतीसे मिस्टेक, लुंगी डान्स, विजयीभव, शिवकन्या, अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर करण्यात आली या नाटकाचे लेखन स्मिता जोशी आणि दिग्दर्शन कृतिका कोराम यांनी केले. कार्यक्रमांमध्ये विविध संस्कृतीचे दर्शन घडविणारे नृत्य सादर करण्यात आले यामध्ये डोंबारी डान्स, भांगडा, झांसी की रानी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज विविध सण उत्सव यांच्यावर आधारित नृत्य सादर करण्यात आले.ठीक १२.०० वाजता सभेला सुरुवात झाली या सभेला विविध क्षेत्रातील मान्यवर ,कार्यकारणी सदस्य ,प्रमुख पाहुणे उपस्थित होते . सभेची सुरुवात स्वागतम शुभ स्वागतम या स्वागत गीताने झाली आपल्या सुरेल आवाजाने प्रज्ञा फुलपगार व विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले.सभेचे प्रास्ताविक प्राथमिक विभाग प्रमुख यांनी केले. प्रास्ताविकामध्ये शाळेची एकूण शैक्षणिक प्रगती ,विविध स्पर्धा परीक्षा, दहावी निकाल विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या दृष्टिकोनातून केला जाणारा प्रयत्न याची माहिती दिली. विविध संस्था रोटरी क्लब ,लायन्स क्लब विविध मान्यवर सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून मिळालेली देणगी या संदर्भात माहिती देण्यात आली या सर्वांचा उपयोग शाळेच्या एकूण विकासासाठी करण्यात आला असे सांगण्यात आले. जम्मू कश्मीर मध्ये भरविण्यात आलेल्या कराटे स्पर्धेमध्ये प्रशालेतील आर्या म्हस्के व अंश जाधव यांना मिळालेले गोल्ड मेडल याचा उल्लेख करण्यात आला.

यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमांमध्ये आदर्श विद्यार्थी सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यामध्ये इयत्ता १० वी क श्वेता तानाजी दाभाडे,इयत्ता ७वी केतन सांगडे व इयत्ता ७वी कृतिका धसाडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमांमध्ये क्रांतिकारकांची स्मरणगाथा या हस्तलिखित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले यामध्ये इयत्ता पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांनी विविध क्रांतिकारकांचे पेन्सिल स्केच तयार केलेले आहे व त्यांची माहिती लिहिलेली आहे या माहितीसाठी काही विद्यार्थी स्वतः क्रांतिकारकांच्या ठिकाणी जाऊन भेट देऊन आले. या हस्तलिखित पुस्तकासाठी कला शिक्षिका पूजा चांदेकर यांचे योगदान लाभले त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

*प्रमुख अतिथी वंदना सुनील राजे निंबाळकर* *सामाजिक कार्यकर्ता* यांनी शाळेचे कौतुक केले त्यांनी शाळेतील विविध उपक्रम व आज कार्यक्रमांमध्ये विविध संस्कृतीचे दर्शन घडविणारे जे कार्यक्रम घेण्यात आले त्याचा उल्लेख केला. *रोटरी क्लब ऑफ थेरगाव चे प्रेसिडेंट* *दत्तात्रय कसाळे* यांनी शाळेसंदर्भात माहिती देताना सांगितले की गेली २५ वर्ष मी या शाळेची प्रगती पाहत आहे .सर्व शिक्षक, मुख्याध्यापक पालक विद्यार्थी एकत्र कार्य करत आहेत .आजच्या कार्यक्रमामधून परंपरा व नाविन्यता याची सांगड घातलेली मला दिसली. *कोरियन कंपनी मॉम हेल्थकेअर थेरपीचे ओनर आकाश कदम* हे म्हटले शिक्षणामधून सेवा घडविण्याचे कार्य आपण करत आहात तसेच आरोग्य हीच खरी संपत्ती आहे त्याची काळजी सर्वांनी घ्यावी. *जगदाळे कोचिंग क्लासचे संचालक व* *रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी चे प्रेसिडेंट गोविंदजी पुंडलिक जगदाळे* हे म्हटले आपल्या शाळेकडे पाहिल्यावर मराठी असल्याचा अभिमान मला वाटतो ज्ञान ,विज्ञान शिक्षण प्रसार हे कार्य आपली शाळा करत आहे. यानंतर पुन्हा उर्वरित कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यानंतर सोलो डान्स साई धोत्रे या विद्यार्थ्याने सादर केला उडी उडी जाय या नृत्या वरती विद्यार्थिनींनी विविध व्यायामाचे प्रकार करून दाखविले.माध्यमिक विभागातून आकांक्षा रोडे इयत्ता नववी क या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाची सुरुवात माहिती द्वारे केली .स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित नृत्य नाटक सादरीकरण करण्यात आले. जुन्याकडून नव्या कडे विविध गाणी सादर करण्यात आली. विविध नाती दाखविणारे गाणे सादर करण्यात आले . त्याचप्रमाणे लावणी नृत्य सादर करून भारतीय परंपरा चे दर्शन घडविण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी मंगळागौर नृत्य पालक महिलांनी सादर केले.आपली भारतीय परंपरा ,लोक संस्कृती, लोक इतिहास याचे दर्शन घडविणारे विविध कार्यक्रम स्नेहसंमेलनात घेण्यात आले. अतिशय आनंदी प्रसन्न अशा वातावरणामध्ये कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमासाठी माजी मुख्याध्यापिका शालिनी म्हात्रे यांनी लुंगी डांस इयत्ता पहिली या नृत्यासाठी हजार रुपये दिले. क्रांतिवीर चापेकर या शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वासंती तिकाेने यांनी पाचशे रुपये बाल विभागासाठी दिले. शाहरुख सय्यद या पालकांनी करंट लगा या गाण्यासाठी पाचशे रुपये दिले. संतोष मायने यांनी दोन हजार रुपये कार्यक्रमासाठी दिले. वंदना राजे निंबाळकर यांनी २५ हजार रुपये शाळेला देणगी स्वरूपात दिले त्याचप्रमाणे प्रियदर्शनी गुरव आत्मजा फाउंडेशन यांच्यातर्फे शाळेला २५ हजार रुपये देण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती डॉक्टर रंजनाताई नवले, सुनील जगताप, कार्यकारिणी सदस्य नितीन बारणे, आसाराम कसबे,राहुल बनगोडे, लायन्स क्लब ऑफ पुणे फिनिक्स चा प्रेसिडेंट नंदिताताई देशपांडे, थेरपी क्षेत्रातील सेंटरच्या ओनर पूनम ताई शुभम झांजुर्णे, सेवानिवृत्त शिक्षिका वनिताताई बकरे, माजी विद्यार्थी केशव गोरे, संकेत हलगेकर, क्रांतिवीर चापेकर शाळेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग प्रमुख वर्षाताई जाधव उपस्थित होते.या सुंदर बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता जोशी यांनी केले. आभार मंजुषा गोडसे यांनी मांडले त्यांनी प्राथमिकचे सांस्कृतिक प्रमुख म्हणून कार्य पाहिले. माध्यमिक सांस्कृतिक विभाग प्रमुख योगिनी शिंदे सहायक अश्विनी जाधव यांनी कार्य पाहिले. या कार्यक्रमाला प्राथमिक विभाग प्रमुख नटराज जगताप माध्यमिक विभाग प्रमुख अश्विनी बाविस्कर बाल विभाग प्रमुख आशा हुले व संकुलातील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग व माजी, आजी विद्यार्थी उपस्थित होते.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button