टाकळी हाजी (प्रतिनिधी)

न्यू इंग्लिश मिडीयम शाळा,निघोज येथे आयोजित केलेल्या रंगसंगती स्पर्धेत टाकळी हाजी येथील आरोग्य सेवक डॉ.सचिन सुभाष चोपडा यांची कन्या कु.परिघ्या सचिन चोपडा (इयत्ता-तिसरी) हिने यश संपादन केले असून आंतरराष्ट्रीय रंगोत्सव उत्सव या कार्यक्रमातील रंगसंगती स्पर्धेत तीने तिसरा क्रमांक मिळविला आहे,या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता,सर्व स्पर्धकांमधून परिघ्या हिने घवघवीत यश संपादन केले असून परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिच्या या यशाबद्दल माजी आमदार पोपटराव गावडे,सरपंच अरुणा घोडे,उपसरपंच गोविंद गावडे, सविंदणे जिल्हा परिषद शाळेचे आदर्श शिक्षक राजेंद्र चिकटे, शिरूर तालुका प्राथमिक आरोग्य केंद्र संघटनेचे संचालक संतोष चोपडा, बैलगाडामालक हरिदास गावडे,बापूसाहेब गावडे पतसंस्थेचे संचालक विजय थोरात आदींनी तिचे अभिनंदन केले आहे.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button