…गोलेगाव येथील विठ्ठल मंदिर सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना भाजप व मित्र पक्ष महायुतीचे शिरुर हवेलीचे विधानसभा अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर ( माऊली) कटके यांनी गोलेगाव याठिकाणी गाठभेट प्रचारार्थ दौरा करून सभा घेतली.
गोलेगाव प्रतिनिधी: चेतन पडवळ
ता.१० दादागिरी गुंडगिरी आता खपवून घेतली जाणार नाही.ही निवडणुक आता जनतेने हातात घेतली आहे.त्यामुळे आपल्या विरोधकांला जनताच धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. आमदार अशोक पवार यांच्या त्रासाला शेतकरीवर्ग कंटाळलेला असून .येणाऱ्या निवडणूकीत आपलाच विजय आहे.असा इशाराच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना भाजप व मित्र पक्ष महायुतीचे शिरुर हवेलीचे विधानसभा अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर ( माऊली) कटके यांनी गोलेगाव ता. शिरूर येथील गाठभेट प्रचारार्थ दिला.
शिरूर तालुक्यातील शिदोंडी. निमोणे. मोटेवाडी. गोलेगाव चव्हाणवाडी. तरडोबाचीवाडी याठिकाणी निवडणुक प्रचारार्थ गाठभेट दौरा करण्यात आला. गोलेगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृहात सभा घेण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे.रावसाहेब पवार घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष रवि काळे.पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र जासुद शिरूर बाजार समिती माजी सभापती शशिकांत दसगुडे.पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे. माजी सैनिक बी.जी. पाचर्णे. गोलेगाव सरपंच दिपाली पडवळ.उपसरपंच निलेश बांदल.माजी सरपंच दिलीप पडवळ. माजी सरपंच राजेंद्र कटके. सरस्वती कटके. चेअरमन संतोष वर्पे. पांडुरंग पाचर्णे.बाळु वाखारे.दिलीप लोखंडे.योगेश कटके व ग्रामस्थ उपस्थित होते.