निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार

माईलस्टोन एज्युकेशन नेटवर्क च्या माईलस्टोन इंटरनेशनल स्कुल, कांगावा अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सोहळा साजरा करून सध्या महिला आणि मुलीवरील वाढते अत्याचार थांबविण्यासाठी विश्वबंधुता, सामाजिक सलोखा, सर्व धर्म समभाव’ तसेच राष्ट्रीय एकात्मता आदी नितीमुल्यांची गरज असून लहान वयातच शाळेतील मुलां-मुखीनख्याप्रकारचं मुलभुत सुसंस्कार रुजविण्याची तसेच अंगीकारण्यासाठी शालेय स्तरावर ‘सामुहिक स्वावचनसार कार्यक्रम गविण्याची गरज असल्याचे मत ‘माईलस्टोन एज्युकेशन नेटवर्क लि. चे कार्यकारी संचालक राजाराम पाटील सोनवणे यांनी यावेळी बोलताना सांगीतले.

रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून संस्थेने कारेगाव येथील शासन ‘सामुहिक रक्षाबंधन’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले होते. आज कुटुंब लहान झाली. अशावेळी प्रत्येकाला बहिण-भावाचे प्रेम लाभावे. समाजात बंधुभावना ह व्हावी यासाठी शाळा शाळांत हा रक्षाबंधन सण ताई-दादा सण म्हणून साजरा होतो अन्य नात्पात कितीही दुरावा निर्माण झाला तरी एकमेकांवर अढळ विश्वास ठेवणारे नाते असते ते बहिण भावाचे जीवनात प्रसंग कसाही येवो. भाऊ बहिण एकमेकांच्या पाठिशी नक्कीच उभे राहणार ही दोघांनाही खात्री असते. बहिण मग ती लहान असो वा मोठी ती जन्मभर भावावर आई समान प्रेम करतेच.

बहिण भावाच्या अतूट नात्याचे प्रतिक म्हणजे राखी ही राखी म्हणजे केवळ सुताची चिंधी नाही. तर समर्पण भावाचे ते द्योतक आहे. सध्याच्या त्रिकोणी चौकोनी कुटुंब व्यवस्थेत जग जवळ येतेवेळी रक्ताच्या नात्याएवढेच मानलेल्या नात्याचेही महत्त्व अधोरेखीत करणारे ‘सामुहिक रक्षाबंधन’ हे म्हणजे आजच्या समाजासाठी आदर्शच आहे अशी त्यांनी पुढ सांगीतले.

या अनोख्या उपक्रमाचे पालकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून उपक्रमशील शाळा म्हणून ‘माईलस्टोन’ ची एक वेगळी ओळख निर्माण करण्यामध्ये मनेजमेंट सह पालकांचाही मोठा सहभाग असल्याचे प्रिन्सीपल कांचन सोनवणे यांनीसांगीतले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन माइस्टोनच्या संचालिका तथा प्रिन्सीपल कांचन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नाईलस्टोन टीमने केले असुन सुत्रसंचालन स्वेता संकपाळ यांनी व प्रास्ताविक मनिया ताटे यांनी व्यक्त केले तर आभार प्रदर्शन नम्रता सोनवणे यांनी केले.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button