निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार
निर्वी(ता.शिरूर) अंगणवाडी येथे एकात्मिक बाल विकास सेवा विकास योजना अंतर्गत राष्ट्रीय पोषण जनजागृती अभियान अंगणवाडी येथे साजरा करण्यात आला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या फोटो ला हार तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी स्नेहा भोरडे यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत तसेच सूत्रसंचालन केले.यावेळी ग्रा पंचायत सदस्य अनिल कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की मुलाचे विकास घडत असताना त्याची आई आणि ते मुल सुदृढ कशी असावे या संबंधित शासनाने अनेक दिवसांपासून या योजना राबविल्या आहे या योजना राबवित असताना अजूनही काही प्रमाणात मुलाचे पोषण मातांचे पोषण चांगल्या पद्धतीने होत नाही त्या उद्देशाला अनुसरून हा प्रकल्प राबविण्यात आला आहे
शासनाने राबविला आहे हा प्रकल्प हा उपक्रम राबवीत असताना मुलाचे शारीरिक, मानसिक, भावनिक, हे तिन्ही विकास चांगले व्हावे या अनुषंगाने आपण हा कार्यक्रम आयोजित करत आहोत. अनेक प्रकारचे उपक्रम या अंगणवाडी मध्ये आपण आयोजित करत आहात याचा एक व्हाट्सअप ग्रुप आहे त्यांच्या माध्यमातून आम्हाला दररोज माहिती मिळत आहे आज मुलाने उपक्रम केला आहे आणि तो आपण त्याच्याकडून कसे करून घ्यावे आज मुलाने कुठला उपक्रम केला पाहिजे आणि तो आपण कशाप्रकारे करून घ्यायची ही सुद्धा माहिती आम्हाला मिळते विविध विषयावरती मोलाचे असे मार्गदर्शन केले. तसेच सुपरवायझर राणी कांबळे यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की तीन महिन्याचे बाळ जरी असेल तरी पालकांनी दुर्लक्ष करू नका शून्य ते तीन वर्षापर्यंतच्या बाळाची मेंदूची वाढ 80 टक्के होत असते पालकांपर्यंत हा संदेश आपल्या अंगणवाडी सेविका व गृहभेट यांच्या माध्यमातून पोहोचवण्याचे काम करावे. पोषण आहारा चे महत्व निरोगी बालकांसाठी पोषण आहार किती महत्त्वाचा आहे यासंदर्भात मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सही पोषण तर देश रोशन, हर घर पोषण त्योंहार उत्सव असा जयघोष यावेळी करण्यात आला या कार्यक्रमाचा महिला वर्गात मोठा उत्साह दिसत होता. यावेळी ग्रामपंचायत सदस्य भाग्यश्री बुऱ्हाडे ,ग्रामपंचायत सदस्य अनिल कांबळे, कमलेश बुऱ्हाडे महिला बचत गट अंगणवाडी ताई आदींनी आपला सहभाग नोंदवला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वच अंगणवाडी ताईंनी परिश्रम घेतले. यावेळी सर्वांचे आभार कविता शितोळे यांनी मानले.