शुभम वाकचौरे

शिरूर गावच्या हद्दीत सिध्दार्थनगर येथे पडक्या घराशेजारी चार जण तीन पत्ती जुगार खेळत होते. जुगार खेळत असताना रोख रक्कम, जुगाराचे साधणे असा एकुण ५०५०- रू चे मालासह मिळुन आले आहेत.त्यांचे विरुद्ध पोलीस अंमलदार विनोद रामनाथ काळे यांनी शिरूर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.

या बाबत हकिकत अशी की( ता: २३ ) रोजी ६.०० वा. मौजे शिरूर गावचे हद्दीत सिध्दार्थनगर येथे पडक्या घराशेजारी ता. शिरूर जि. पुणे येथे इसम नामे 1) प्रभाकर विठठल गव्हाणे वय ३९ वर्ष रा. सयदनगर, शिरूर 2) खंडु पांडुरंग खोमणे वय २९ वर्ष रा. सिध्दार्थनगर, शिरूर 3) परमेश्वर एतवारी पंडीत वय ४८ वर्ष रा. मंगलमुर्तीनगर, शिरूर 4) ज्ञानेश्वर उर्फ माउली पंढरीनाथ शेलार वय ४९ वर्ष रा. सिध्दार्थनगर, शिरूर ता. शिरूर जि. पुणे हे तीन पत्ती जुगार खेळत असताना रोख रक्कम, जुगाराचे साधणे असा एकुण ५०५०, रू चे मालासह मिळुन आले आहेत. म्हणुन त्यांचे विरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला आहे.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button