जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर

मुसळधार पावसामुळे दरडप्रवण भागातील नागरिकांची सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेण्याबाबत सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रांत तसेच प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. आंबेगावच्या आदिवासी भागात आहूपे खोऱ्यात मुसळधार पावसामुळे आसाणे (कुंभेवाडी) घाटामध्ये दरड कोसळल्याने तीन वाड्यांचा संपर्क तुटला आहे. तर जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील माळशेज घाट ते जुन्नर या मार्गावरील गणेश खिंडीत दरड कोसळली त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असल्याने राज्याचे सहकारमंत्री मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या सुचनेनुसार जुन्नर आंबेगाव उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे,तहसीलदार रविंद्र सबनीस, नागटिळक,पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील,माजी सभापती प्रकाश घोलप,संजय गवारी तसेच पदाधिकारी यांनी घटनास्थळी पोहोचले आहेत.

प्रशासनाच्या वतीने मदतकार्य सुरू केले असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच तालुक्यातील सर्व परिस्थितीवर राज्याचे सहकारमंत्री मा.ना.दिलीपरावजी वळसे पाटील हे स्वतः जातीने लक्ष ठेवून आहेत.हवामान विभागाने येत्या काही तासांत पुणे शहर,आंबेगाव, मावळ,जुन्नर,खेड तालुक्यातील परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने या भागातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत.तरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी व आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन, आपत्ती व्यवस्थापनाने केली आहे.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button