निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार
निर्वी(शिरूर)येथे नवभारत साक्षरता कार्यक्रम निरक्षरांचे सर्वेक्षण करताना निर्वी मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तीन पैकी दोन शिक्षकांवर मोटरसायकलने पाठीमागून येऊन धडक दिली त्यामध्ये मनीषा सुनील लटांबळे या गंभीर जखमी झाल्या तसेच संगीता दिलीप घुले या जखमी झाल्या. अपघाताची माहिती समजताच दिलीप घुले सर व कल्पना बडे मॅडम तसेच ग्रामस्थांनी त्यांना निर्वी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी उपचारासाठी आणले यावेळी मनीषा लटांबळे यांना हाताला, पायाला, तसेच डोक्याला गंभीर जखमा झाल्या यांच्या पायाचे हाड फॅक्चर झाल्यामुळे तसेच संगीता घुले मॅडम यांच्या डोक्याला तसेच पायाला जखम झाल्यामुळे प्रथम उपचार करून करून त्यांना पुढील उपचारासाठी मनीषा लटांबळे मॅडम यांना शिरूर येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले तसेच संगीता घुले मॅडम यांना रांजणगाव गणपती येथील डॉ.दुंडे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले.
यावेळी मनीषा लटांबळे मॅडम यांच्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यांच्या पायाचे ऑपरेशन करण्यात आले. सध्या ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे पारनेर चे लोकप्रिय आमदार निलेश लंके यांना अपघाताची माहिती समजताच तात्काळ त्यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन मनीषा लटांबळे मॅडम यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.तसेच संगीता घुले मॅडम यांना उपचार करून घरी सोडण्यात आले.
शिक्षकांना घरोघरी जाऊन असे सर्वे व इतर मतदार याद्याB LO कामे अशी अशैक्षणिक कामे करावी लागतात. त्यात महिला शिक्षकांचे हाल होतात. व मानसिक शारीरिक संकटांना तोंड द्यावे लागते. त्यामध्ये अनेक संघटनांनी बहिष्कार घालून पण सरकारने इतर स्वयंसेवी संस्थानांना कामे द्यावी अशी मागणी संघटनांनी केली आहे यावेळी निर्वी येथील मुख्याध्यापक घुले सर कल्पना बडे मॅडम तसेच निर्वी ग्रामस्थांनी जखमींना दवाखान्यामध्ये नेण्यास मदत केली त्यामुळे पुढील उपचार करण्यास मदत मिळाली.
शालेय पोषण आहार शिजवणे, बिल तयार करणे,ऑनलाईन माहिती भरणे, वेगवेगळ्या लिंक भरणे, यामध्ये भरायच वेळ खर्च होतो विद्यार्थ्यांशी शिकवण्यास वेळ मिळत नाही.मतदान यादी तयार करणे कामी प्राथमिक शिक्षक यांची मदत घेतली गेली असल्याने शिक्षकांचा बराचसा वेळ या कामी खर्च होत असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वेळ अपुरा पडत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे गुणवत्तेवर आपोआपच परिणाम होणार आहे शाळा सोडून शिक्षक घरोघरी वाडीवस्त्यावर फिरताना दिसत आहे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टिकोनातून याबाबत प्रशासनाने विचार करून शिक्षकांना मतदार यादींच्या जबाबदारीतून मोकळीक दिल्यास निश्चितच योग्य ठरेल असे पालक वर्गातून बोलले जात आहे.