प्रतिनिधी : एकनाथ थोरात
शिरूर तालुक्यातील निमोणे येथे गेले काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढली आहे, सुरक्षा व सुव्यवस्था राखता यावी यासाठी शिरूर येथील ॲड.सुमित देविदास पोटे यांनी ग्रामस्थांच्या वतीने पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना निमोणे येथे पोलीस चौकी स्थापन करावी असे निवेदन दिले आहे.निमोणे गावचे क्षेत्रफळ लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक बसेल या दृष्टीने निमोणे येथे पोलीस चौकी स्थापन करण्याची नितांत गरज आहे.
निमोणे गावच्या हद्दीतील वाढती गुन्हेगारी रात्री अपरात्री कोऱ्या नंबर प्लेट च्या वाहनांचा वाढता वावर स्थानिक नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करत आहे, सदर बाबींचे गांभीर्य लक्षात घेत निमोणे येथे पोलीस चौकी स्थापन करण्याची आवश्यकता लक्षात घेत ॲड. पोटे यांनी शिरूर शहराचे पोलीस निरीक्षक संजय जगताप व उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी यांना निवेदन दिले आहे.
यावेळी पो.निरीक्षक संजय जगताप यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात वरीष्ठांशी चर्चा करून आपल्या पोलीस चौकीच्या मागणीला प्राधान्य देऊ असे आश्वासन दिले, या संदर्भात शिवसेनेचे तालुका अध्यक्ष पोपटराव शेलार यांनी पत्र दिले आहे.