जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर

उदापुर ता:-जुन्नर येथील सोशल मैत्री ग्रुपच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा उदापूर,कुलवडे मळा आणि भैरवनाथ नगर,शिंदेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात करून तसेच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत गरीब गरजू विद्यार्थिनी पल्लवी रवींद्र पवार हिला यंदा दहावीला ८५% मार्क्स मिळवले शिक्षणाची प्रचंड आवड असतानाही घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे वडिलांनीशिक्षणासाठी नकार दिला होता त्यामुळे ती नाराज झाली होती ही बाब मैत्री सोशल ग्रुपला समजल्याने ग्रुपने पल्लवी पवार हिला सर्व मदत करून ओतूर येथील आण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून दिले आणि तिला वह्या, पुस्तके,दोन गणवेश किट आदी साहित्य भेट म्हणून दिले.

हॉटेल तिरंगा मधील कामगार गजानन ठोंगिरे यांचे अपघाती निधन झाले; त्यांच्या दोन मुलांना शालेय गणवेश आणि वही,पेन चे वाटप ग्रुपच्या वतीने करण्यात आले.यासोबतच प्रशांत उमाप याला सुध्दा शालेय वस्तू देण्यात आल्या.दिवंगत अकबर मोमीन यांच्या दोन्ही मुलांना शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले.त्याचप्रमाणे पुढच्या वर्षी देखील शाळांना उपयोगी साहित्य देण्याचा मानस ग्रुपच्या वतीने व्यक्त करण्यात आला. यावेळी धनंजय ढमढेरे, सागर रायकर,अजित शेख, संतोष माळवे,किशोर माळवे, राजू शिरसाठ,दीपक रायकर, एकनाथ अमूप,विनायक अमूप, अक्रम मोमीन,चंदू माळवे, अशोक माळवे,सिद्धार्थ ठोसर, मनोज चौधरी,आयाज मोमीन, नितीन शिंदे,संजय बुगदे,संतोष माळवे,किरण माळवे,इम्रान आतार,अमित्त ठोसर,संजय माळवे,सुशांत आमले,बाळू म्हसणे,सुरेश लोखंडे,संतोष मानकर,जावेद मोमीन,रियाज मोमीन,सईद मोमीन,गणेश शिंदे, सचिन शिंदे,सुनील माळवे, ग्रुपचे सदस्य, गावातील इतर मान्यवर, शाळांचे सर्व शिक्षकवृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button