जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर

हिंदी भाषा भारतीय जीवनमूल्य,संस्कृती व एकतेची प्रतीक आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा,पुणे चे उपाध्यक्ष पुरुषोत्तम पगारे यांनी केले आहे.महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा,पुणे,श्री.शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर व पंचायत समिती जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय हिंदी शिक्षक कार्यशाळेमध्ये ते बोलत होते.त्यांनी जुन्नर तालुक्यातील हिंदी शिक्षकांना हिंदीचे महत्व पटवून देत विद्यार्थ्यांना हिंदी कडे आकर्षित करण्यासाठी प्रेरित केले तसेच महाराष्ट्र राष्ट्र्भाषा सभा पुणे यांचे कडून घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांविषयी विस्तृत माहिती दिली.

या कार्यशाळेचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाघमारे यांनी भूषविले . त्यांनी आपल्या भाषणात आजच्या युगातील हिंदीचे महत्व पटवून दिले तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार भाषांचे महत्व स्पष्ट केले.या प्रसंगी महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणेचे पदाधिकारी डॉ.निला महाडिक,रविकिरण गळंगे, श्रीपाद भोंग.वृंदा कुलकर्णी, सुचित्रा कुलकर्णी इत्यादी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या समन्वयक प्रा.प्रतिभा लोढा, पर्यवेक्षक प्रा समीर श्रीमंते हे उपस्थित होते.या प्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ.बाबासाहेब माने लिखित ‘किसान’ काव्य-संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.ज्ञानेश्वर सोनार,सूत्रसंचालन प्रा.रेखा गायकवाड,प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.योगेश घोडके व प्रा.पुनम मनसुख तर आभार प्रदर्शन प्रा.विकास वाघमारे यांनी केले.या कार्यशाळेस हिंदी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यशाळेसाठी जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड संजय काळे,अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.विलास कुलकर्णी व गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button