प्रतिनिधी : जिजाबाई थिटे

रांजणगाव गणपती येथील मंगलमूर्ती विद्याधाम प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील थोरात यांनी सुमारे ३० वर्षाच्या सेवा काळामध्ये केलेल्या शैक्षणिक,सामाजिक कार्याची दखल घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर कार्यकारी समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष भीमराव धिवार यांच्या संकल्पनेतून छत्रपती राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा २०२४साठीचा आदर्श शिक्षक पुरस्कार रविवार दि.२१जुलै २०२४रोजी कस्तुरी हॉल उरुळी कांचन या ठिकाणी प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.रविंद्र चव्हाण मा. संचालक यशदा व बार्टी महाराष्ट्र शासन तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.रवींद्र मोरे उपायुक्त महिला व बालकल्याण विभाग महाराष्ट्र शासन उपस्थित होते.मुख्याध्यापक श्री थोरात यांना आजवर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत या पुरस्काराने आणखी जबाबदारी वाढली असून भविष्यामध्ये आणखी चांगले काम करण्याचा प्रयत्न राहील असे त्यांनी सांगितले! त्याचप्रमाणे प्रशालेतील अध्यापिका छाया शेलार यांचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन समितीने त्यांची आदर्श शिक्षिका म्हणून निवड करून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला!प्रशालेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील लांडे, राजेंद्र पडवळ,अनुसया तुमेदवार शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री बापू खेडकर व सर्व समिती सदस्यांनी यांनी प्रशालेत येऊन अभिनंदन केले तसेच शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा शालेय शाळा समितीचे अध्यक्ष श्री प्रकाश बोरा संस्थेचे सचिव श्री.नंदकुमार निकम सर या सर्वांनी मुख्याध्यापक श्री.सुनील थोरात व सौ.छाया शेलार यांचे पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समितीचे कार्याध्यक्ष विजय शिंदे,सचिव रा.वि.शिशुपाल, सहसचिव विजय रोकडे व इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button