प्रतिनिधी : सचिन थोरवे
सर्व गणेश भक्तांनी गणरायाची चांगल्या प्रकारे दहा दिवस भक्ती भावाने सेवा करून अनंत चतुर्थीच्या दिवशी उत्साही आणि जल्लोष वातावरणात गणरायाला निरोप देताना अक्षरशः काहींच्या डोळ्यांमध्ये अश्रू पाहायला मिळाले.
सामाजिक बांधिलकी म्हणून डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्याकडून गेले अनेक वर्षापासून पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून आणि पर्यावरणाचा समतोल राखावा यासाठी नदी प्रदूषित होऊ नये नदी प्रदूषित झाल्यास ते पाणी आपल्या वापरात आल्यास त्याचा घातक परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो आणि तो होऊ नये म्हणून जुन्नर तालुक्यात डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्याकडून निर्मल्य संकलनाचा उपक्रम जुन्नर तालुक्यात राबवण्यात आला आहे. जुन्नर तालुक्यात हा निर्मल संकलनाचा उपक्रम नारायणगाव वारूळवाडी चिमणवाडी आर्वी तर्फे पिंपळगाव गुंजाळवाडी येणेरे जुन्नर पिंपळवंडी या ठिकाणी राबविण्यात आला असून यामधून साधारणता 15 टन निर्माल्य संकलन करण्यात आले आहे.
निर्माल्य संकलन करण्याचा उपक्रम राबवत असताना सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत तालुक्यात 200 ते 250 श्री सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी सहभाग घेतला होता.