शिरूर प्रतिनिधी: शकील मनियार
14 जुलै रोजी कोल्हापुरातील विशाळगड आणि गजापूर येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा दि 22 जुलै रोजी शिरूर शहर मुस्लिम जमात व ह्यूमन राईट यांच्यावतीने तहसीलदार तसेच शिरूर पोलीस स्टेशन ला निवेदन देत जाहीर निषेध करण्यात आला वरील घटना माणुसकीला काळीमा फासणारी व जीवीतास मालमत्तेची नुकसान करणारी आहे गडावरील अतिक्रमण हटविणे न्यायालयीन व जिल्हा प्रशासनाचे काम आहे तसेच तेथे व्यवसाय करणारे सर्व जाती धर्माचे नागरीक आहे .
त्यामुळे त्यावर न्यायलयीन खटला चालु आहे तसेच ते सर्वांनी मान्य केले आहे जिल्हा प्रशासन त्या निकषाप्रमाणे कारवाई करेल गडापासुन गजापुर मुसलमानवाडी ४ की .मी . अंतरावर आहे त्या ठीकाणी असलेले नागरिक सर्व जाती धर्माचे आहेत त्यांच्या खाजगी जागेत मस्जीद व मंदीर आहे त्यावर हल्ले करणारे उध्वस्त करणारे धार्मिक स्थळाना वास्तुना दिव्य ग्रंथ कुराण फाडणे जाळणे विटंबना करणे या निमित्ताने दंगल घडवुन आणणे प्राणीमात्र त्यांच्या जिवीतास धोका निर्माण करणे या निमित्ताने दंगल घडवुन आणने प्राणीमात्र त्यांच्या जीवीतास धोका निर्माण करणे. कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही म्हणून सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करून जाळपोळ मध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई तात्काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावी व संबंधित जमावावर कायदेशीर कारवाई करून आरोपींना आणि महाराष्ट्रामध्ये कायद्याचे राज्य प्रस्थापित करावे.
या वेळी नसीम खान, सिकंदर मण्यार, जमीर सैय्यद ,मुजफ्फर कुरेशी ,साबीरभाई शेख , मुस्ताक खान ,बबलु भाई सौदागर, मौलाना ताहीर काझी, मौलाना कैसर फैजी मौलाना आरीफ काझी, शेख अबिद मोहम्मद ,अमजद पठाण, कदीर सौदागर, राजु शेख, तौसिफ खान , मौलाना फैय्याज काझी, अहमद करीम खान , रफीक सिकलकर, अकबर आत्तार सर, हुसेन शहा ,मोहम्मद हुसेन , फिरोज बागवान उपस्थित होते.