शुभम वाकचौरे

शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे.संबंधित आरोपीवर शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी इंदाराम दिगंबर हीलाळ (रा. घनेशी, गणेशनगर, कवठे येमाई) या संशयितावर पॉस्को कायद्यान्वये शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मौजे कवठेयेमाई, ता. शिरूर जि. पुणे गावचे हद्दीत पीडिता ही गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास तिच्या घरासमोर पत्र्याचे शेडमध्ये बसली असताना. संशयित इंदाराम दिगंबर हिलाळ रा. घनशी, गणेशनगर, कवठे येमाई, ता. शिरूर, जि. पुणे याने पत्रा शेडची बाहेरून लावलेली कडी काढुन आत आला.त्याने तिचा हात धरला पिडीतेने विरोध केला असता. त्याने तिला मिठी मारून घरात ओढत नेले. पिडीतेने घाबरून आरडाओरडा केल्याने तो तेथून निघुन गेला. जाताना त्याने सांगितले की तु कोणाला सांगशील तर तुला जीवे मारून टाकीन असे बोलुन धमकी दिली.

या घटनेचा तपास पोलीस उगले, पोलीस पवार हे प्रभारी अधिकारी जोतीराम गुंजवटे पोलिस निरीक्षक शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button