शुभम वाकचौरे
शिरूर: कोणी रस्ता देत का रस्ताया आशयाचे फ्लेक्स बोर्ड लावून बहुजन मुक्ती पार्टी शिरूर यांच्या वतीने शिरूर शहरातील संविधान चौकात संवैधानिक पद्धतीने शिरूर नगरपरिषदेचा जाहीर निषेध नोंदविण्यासाठी आनोखे स्वाक्षरी मोहीम हे आंदोलन करण्यात आले.सदर आंदोलनात शहरातील असंख्य लोकांनी उपस्थित राहुन स्वाक्षरी करून शिरूर नगरपरिषद विरोधात आपला निषेध नोंदवीला आहे. शिरूर नगरपरिषद हद्दीत मंगलमुर्ती नगर, मदारी वस्ती, ढोमे वस्ती या ठिकाणी पक्का रस्ताच नाही.
या ठिकाणी पावसाळ्यात लोकांना ये -जा करण्यासाठी चिखलातून प्रचंड कसरत करावी लागत आहे.महिला-लहान मुले या चिखला मध्ये घसरून पडत आहेत.काहींचे हात-पाय मोडून जखमी झालेत.तरी वरील ठिकाणी शिरूर नगरपरिषद यांनी ताबोडतोब पक्का रस्ता बनवून नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी .नाही तर बहुजन मुक्ती पार्टी येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात तिव्र आंदोलन करणार आहे.या आंदोलनात शहरातील लोकांनी शिरूर नगरपरिषदेचा व प्रशासनाचा जोरदार विरोध करून निषेध व्यक्त केला आहे.
यावेळी बहुजन मुक्ती पार्टी चे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष फिरोजभाई सय्यद, शिरूर शहराध्यक्ष समाधान लोंढे, शिरूर शहर सचिव सागर घोलप, शिरूर शहर संघटक अशोक गुळादे, प्रहार सैनिक संघटनेचे पदाधिकारी सुदर्शन शिर्के, भारतीय विद्यार्थी मोर्चा शिरूर तालुका अध्यक्ष सुलतान शेख,तसेच शिरूर शहरातील भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष संपत लोखंडे, मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबुबभाई सय्यद,मनसे शिरूर शहर सचिव रवी लेंडे,भारत मुक्ती मोर्चा चे विजय भोईरकर,आम आदमी पार्टीचे अनिल डांगे तसेच असंख्य नागरिकांनी स्वाक्षरी करून निषेद व्यक्त केला आहे.