निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार
निमोणे (ता . शिरूर)येथे दि2६ रोजी . श्री नागेश्वर विद्यालय निमोणेत माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे अरविंद काळे, दत्ता काळे, ॲड.संदीप काळे, अरुण होळकर यांनी आयोजन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच स्वागत रवींद्र थोरात यांनी केले. यावेळी शाळा संस्थापक माजी मुख्याध्यापक जे आर काळे माजी मुख्याध्यापक गुंड सर, उपशिक्षक पी एस दुर्गे, उपशिक्षक बी व्ही काळे, उपशिक्षक व्ही पी काळे, उपशिक्षक भगवान काळे शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र ढवळे, सेवक सकट एम आर आदी शिक्षक वृंद उपस्थित होते.
यावेळी अरविंद काळे, दत्ता काळे, र्ॲड.संदीप काळे, रवींद्र थोरात, कुसुम थेऊरकर(वाळके)सुनीता काळे(लगड) मनीषा देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.विद्यार्थ्यांनी स्वतःचा परिचय करून दिला नवीन जुन्या आठवणीला उजाळा दिला शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलांच्या संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते ज्या शाळेत आपण शिकलो मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीही विसरल्या जात नाहीत असे मत आपल्या मनोगत मध्ये माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. सुमारे 27 वर्षानंतर श्री नागेश्वर विद्यालयात पहिलाच स्नेह मेळावा झाला आहे त्याला 3९पैकी 30 माजी विद्यार्थी विद्यार्थिनी. उपस्थित होते तसेच रवींद्र थोरात यांच्याकडून दिवंगत शिक्षकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी जवळपास 27 वर्षानंतर भेटले त्यामुळे अनेकांना आपले शाळेचे जुने मित्र मैत्रिणी भेटल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता तर अनेकांनी ही भेट आणि आठवणी आयुष्यभर प्रेरणा आणि उत्साह देत राहील. यावेळी माजी विद्यार्थ्यांकडून शाळेसाठी साऊंड सिस्टिम देण्यात आले तसेच शैक्षणिक सुविधांसाठी सर्वांनी शाळेसाठी मोठा निधी देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
यावेळी सर्व माजी व आजी शिक्षकांचा शाल श्रीफळ फेटे बांधून सत्कार करण्यात आला.शाळेचे संस्थापक माजी मुख्याध्यापक जे आर काळे सर यांनी आपल्या मनोगत मध्ये सांगितले की शाळेच्या स्थापनेपासून आतापर्यंत शाळेची शैक्षणिक वाटचाल तसेच शाळेचा दर्जा चांगला आहे आपल्या शाळेतील विद्यार्थी खेळामध्ये नॅशनल पातळीवर गेलेले आहे आपल्याला अभिमान आहे. शाळेची गुणवत्ता आत्तापर्यंत आपल्या शिक्षकांनी राखली आहे त्यांनी शिक्षकांना धन्यवाद दिले भविष्य काळामध्ये अशीच साथ्यात ठेवा असे मार्गदर्शन केले १९७८ साली शाळेची स्थापना झाली आहे त्यावेळी कशाप्रकारे शाळा चालवली त्यावेळेसचा शाळेचा खडतर प्रवास शाळेसाठी संस्थेचा तसेच ग्रामस्थांचा खूप मोलाचा वाटा आहे सर्वांच्या सहकार्याने ही शाळा उभी राहिली आहे सर्वांना त्यांनी धन्यवाद दिले. या शाळेचे विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात,सहकार क्षेत्रात, गाव गाड्यात, उद्योग क्षेत्रात, व्यवसाय क्षेत्रात ,फिल्मसृष्टीत, विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग अशी भरारी घेत ज्यांनी ज्यांनी या शाळेसाठी मोलाचं योगदान दिले शाळेसाठी निधी दिला त्यांना धन्यवाद दिले भविष्य काळामध्ये सुद्धा आपण सर्वांनी एकत्रित येऊन शाळेसाठी सहकार्य करावे असे आव्हान केले. तसेच उपशिक्षक पी एस दुर्गे व मुख्याध्यापक ढवळे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेचे सचिव संदीप कुंजीर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या कार्यक्रमासाठी पालक ग्रामस्थ मोठ्या बहुसंख्येने उपस्थित होते ॲड संदीप काळे यांनी सर्वांचे आभार मानले.
या कार्यक्रमानंतर सर्वांना स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते