जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर

सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यांमध्ये आपल्याला नेहमीच्या फळांपेक्षा वेगळी फळ पाहायला मिळतात. त्यात आंबट गोड आंभेळी,डोंगरची काळीमैना करवंद, आणि गोड व रुचकर अशी तोरणं होय.आदिवासी भागात स्थानिक नाव : तोरण, तोरणी तर शास्त्रीय नाव :- Ziziphus rugosa इंग्रजी नाव :- Wild Jujube, Kotta,Wrinkled Jujube,Zunna Berry,संस्कृत नाव :-बदरा त्याचे कुळ : Rhamnaceae,उपयोगी भाग:- पिकलेले फळ,उपलब्धीचा काळ :- पिकलेले फळ: एप्रिल-मे झाडाचा प्रकार :-काटेरी झुडूप,अभिवृद्धी:- बिया,वापर:– पिकलेले फळ,बिया भाजून तोरणाचे काटेरी झुडूप महाराष्ट्रातील कोकण,पश्चिम घाटातील ठराविक जंगलात वाढलेले दिसते. पालघर,ठाणे,रायगड,रत्नागिरी,तसेच पश्चिम घाटातील पुणे,नाशिक,नगर,कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तोरणाचे झुडूप रस्त्याच्या कडेला,डोंगरकपारीला वाढलेले दिसते.काही भागात या काटेरी झुडपांचा शेताच्या भोवती तसेच परसबागेला कुंपण बनविण्यासाठी वापर केला जातो.साधारण एप्रिल-मे महिन्यात स्थानिक लोक गावाच्या बाजारात पानाच्या द्रोणामध्येतोरणाची पिकलेली गोड, मधुर अशी लहान लहान फळे विकायला घेऊन बसतात.या फळांना चांगली मागणी असते.

:–वनस्पतीची ओळख — :

तोरणाचे सदाहरित, काटेरी झुडूप साधारण ९ ते १० मीटरपर्यंत उंच वाढते.तांबूस,कोवळ्या फांद्यावर नाजूक लव असून एकेरी किंवा दुहेरी काटे असतात. काटे काहीशे मागे वाकलेले असून ३ ते ५ मी.मी.लांब असतात.जुन्या फांद्या लालसर तांबूस रंगाच्या,खर- खरीत,पट्टे किंवा खोबण्या असणाऱ्या असतात.पानेसाधारण ८ ते १० सें.मी.लांब व ५ ते ८ सें.मी.रुंद असून मोठी व लंबवर्तुळाकार,काहीशी सुरकुतलेली व टोकाशी निमुळती तर कधी गोलाकार होत गेलेली असतात.कोवळी पाने लालसर तांबूस रंगाची व लवयुक्त कालांतराने हिरवी होऊन ३ ते ५ शिरायुक्त असतात.पानाचा देठ साधारण १ ते १.५ सें.मी.लांब. १० ते २० फुले फांदीच्या टोकाशी किंवा पानाच्या देठाच्या बेचक्यातून गर्दीने येणारी असतात. फुलांना पाकळ्या नसून त्याचा बाह्यदल फिक्कट पिवळ्या रंगाचा असता तर दठ १ स.मा. पर्यत लांब असते.फळे ५ ते ८ मिमी व्यासाचे व लंबगोलाकार साधारण १ सें.मी. लांब असते.फळे कच्ची असताना लालसर हिरवी व पिकल्यावर पांढरी होतात. हा पांढरा गर खाण्यासाठी मधुर लागतो. फळाच्या आत एक लहान बी पांढरट रंगाची असते. साधारण डिसेंबर, जानेवारी महिन्यांत तोरणाच्या काटेरी जाळीवर अगदी लहान लहान फुले येऊ लागतात. तर एप्रिल-मे महिन्यात ही फळे पिकून खाण्यास योग्य बनतात.

:–औषधी उपयोग– :

तोरणाच्या पानाचा, सालीचा,फुलांचा औषध म्हणून उपयोग होतो.सालीपासून बनवलेली पेस्ट रक्ताभिसरण सुधारणा आणि वेदना कमी करण्यात येणारा शेक बनविण्यासाठी करतात.तसेच सुजलेल्या हिरड्या व दातदुखी थांबण्यासाठी लावतात.सालीची पावडर शुद्ध तुपासोबत मिसळून तोंड आलेल्या जागी तसेच गालफुगीवर लावतात.एकूण काय जंगलातील प्रत्येक रानमेवा आयुर्वेदिक औषधे गुणधर्मामुळे प्रसिद्ध असतात.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button