जुन्नर प्रतिनिधी : सचिन थोरवे
दिवसेंदिवस अनेक वर्षापासून निसर्गाचा होत असलेला ऱ्हास बेकायदा होत असलेली वृक्षांची कत्तल आणि या सर्व गोष्टींकडे आपण जाणीव पूर्वक पाठ फिरवल्याने याचा आपल्या मानवी जीवनावर दुष्परिणाम होत असलेले चित्र उन्हाळ्यात आपणास पाहायला मिळत असून उन्हाळ्याच्या तीव्र झळा आपल्याला सोसावे लागत आहे.
आपल्याला मे महिन्यात जाणवणारे ऊन आपल्याला एप्रिल महिन्यामध्येच जाणवत असून शेतकरी वर्गाला आपली शेती मशागतीचे कामे केल्याशिवाय पर्याय नसतो उन्हाळी हंगामात बाजरी भुईमूग यासारखे पिके शेतकरी घेत असून त्याच्या खुरपणीची कामे भर उन्हातही महिलांनाच करावी लागतात परंतु उन्हापासून आपले संरक्षण व्हावे यासाठी डोक्यावर टोपी छत्री किंवा थंड पाण्याने भिजवलेला रुमाल वापरावा यामुळे आपण उष्माघाताला रोखू शकतो. सोबतच्या फोटोमध्ये महिला शेतात खुरपणीचे काम करत असताना डोक्यावर छत्रीचा वापर करताना आपल्याला दिसत आहेत. येणाऱ्या पावसाळ्यात आपण भविष्यातील तापमान वाढ कमी करण्यासाठी प्रत्येकाने किमान पाच झाडांची लागवड करून संवर्धन करणे हे काळाची गरज आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राहील आणि भविष्यात तापमान नियंत्रित राहील.