जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर

जुन्नर तालुक्याची जशी छत्रपती शिवरायांची जन्मभूमी म्हणून ओळख आहे तशीच जुन्नर तालुक्यातील सह्याद्रीच्या पश्चिमेकडील डोंगररांगांमध्ये असलेल्या वेगवेगळ्या आयुर्वेदिक वनस्पती व विविध घाटवाटांच्या अस्तित्वामुळे खास ओळख आहे.जुन्नर तालुक्यातील माजी सेवानिवृत्त सैनिक व निसर्गप्रेमी रमेश खरमाळे यांना तालुक्यातील पश्चिम डोंगर रांगात वाटणवेल वेलवर्गीय वनस्पती आढळून आली आहे. वनस्पतीचे महावेल सह्याद्रीच्या डोंगररांगात उंच झाडांवर अत्यंत मजबूत आणि लाकडी बुंधे असलेले एका झाडापासून लांबवर पसरलेले दिसतात.

वाटणवेल वेलवर्गीय वनस्पती प्रामुख्याने पश्चिम घाटात आढळते.या वनस्पतीची फळे भेकर, सांबर यांसारख्या प्राण्यांना व पक्ष्यांना खुप आवडतात तर वाटणवेल वनस्पतीत टॅनीनचे प्रमाण सर्वाधिक असल्याने चामड्याच्या उद्योगात वापरले जाते. वनस्पतीचे वैशिष्ट्य म्हणजे पाने सुकल्यावर काळी होतात.रामायणातील काळात या वनस्पतीस रामरक्षी म्हणून ओळखले जात असे.वेलाच्या खाली बियांचा पसारा मोठ्या प्रमाणात पडलेला दिसतो.बिया अत्यंत रेखीव आणि कोयरीच्या आकारात दिसतात; परंतुत्यावर खूप सुक्ष्म काटे असतात.

संधिवात,पित्तदोष आदी रोगांवर गुणकारी आहे.एप्रिल व मे महिन्यात वेलीवर द्राक्षा सारखे घड लागून फळे लागतात.तर ही फळे पावसाळ्यात जुलै, ऑगस्ट महिन्यात पिकून खाली पडतात,तमिळ भाषेत कोट्टाव्यचाची,मल्याळममध्ये बट्टवल्ली,कोंकणीत मवेटयेलफ अशा नावाने ही वनस्पती ओळखली जाते. पश्चिम घाटातल्या घनदाट जंगलांत आणि आशिया खंडात, सह्याद्रीतल्या देवरायांमध्ये वाटणवेल वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात.

:–आयुर्वेदिक दृष्ट्या पौष्टिक व रूचकर आहार–: जुन्नर तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत २००वर्षांपूर्वीच्या या वेली अगदी दुरवर पसरलेल्या दिसूनयेतात.या वनस्पतीच्या बियांना सुक्ष्म काटे असल्यानेयास काटे कोंभळ म्हणून स्थानिक ओळखतात. वबियांवर असलेले काटे काढून बिया भाजून किंवा उकडुन खातात.अतिशय पौष्टिक व रूचकर आहार म्हणून बिया स्थानिक लोक सेवन करतात.

:- रान जंगली द्राक्ष अशीही ओळख–:

मार्च व एप्रिल महिन्यात वाटणवेल वनस्पतीच्या खोडाला भरून पिवळी फुले येतात.त्यामुळे जंगलात सजावट केल्याप्रमाणे वेली लांबून दिसतात.वसंत ऋतूत या वनस्पतीला मोहोर येतो. मोहोराला मंद सुवास असतो. नंतर वेलीला तोरणासारख्या पांढर्या बारिक फळांचे घोस येतात.वाटणवेल वनस्पतीच्या फळांचे द्राक्षासारखी हीरवी फळे झुपकेदार लटकलेली दिसतात म्हणून यांस रान जंगली द्राक्ष असेही म्हणतात.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button