प्रतिनिधी : सचिन थोरवे

दिनांक 12.2.2024 रोजी दुपारी 02.34 वाजता खोडद येथील वयोवृद्ध महिला नामे सुलोचना कोंडीभाऊ टेमगिरे यांचा कोणीतरी अज्ञात इस्मानी जबरी चोरी करून खून केल्याची घटना घडली होती.

सदर घटनेची माहिती मिळताच माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री पंकज देशमुख सो, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे सो तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग जुन्नर श्री रवींद्र चौधरी सो यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत श्री अविनाश शिळीमकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांनी व त्यांची टीम तसेच

नारायणगाव पोलीस स्टेशन चे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचे आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषण करून सदरचा गुन्हा 48 तासात उघडकीस आणून सदर गुन्ह्यातील आरोपी नामे संकेत श्याम श्रीमंत राहणार गजानन नगर तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा व पूनम संकेत श्रीमंत राहणार गजानन नगर तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा यांना तात्काळ अटक करून जबरी चोरी करून नेलेला मोबाईल व सोन्याचे दागिने हस्तगत केल्याबद्दल कोल्हापूर परिक्षेत्र चे माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील फुलारी सो यांनी तसेच श्री पंकज देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी नारायणगाव पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांचे टीमला *”सर्वोत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण पुरस्कार”* देऊन सन्मानित केले.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button