जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर

दिनांक २८ मार्च रोजी पंचायत समिती जुन्नर,द हंस फाउंडेशन आणि शिक्षणा फाउंडेशन यांच्या सयूंक्त विद्यमाने आयोजीत तालुकास्तरीय उमंग प्रश्नमंजुषा २०२४ स्पर्धा आदिवासी सांस्कृतिक भवन,शिवजन्मभूमी जुन्नर येथे पार पडली, त्यात प्रत्येक केंद्र स्तरावरील विजेते,असे एकूण नऊ केंद्रात महाअंतिम फेरी तालुका स्तरावर पार पडली.

या प्रश्नमंजुषा स्पर्धेत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा खटकाळे शाळेने तृतीय क्रमांक संपादित केला तसेच विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून शासकीय आश्रमशाळा खटकाळे या शाळेचा पुरस्कार शाळा प्रतिनिधी शिक्षक प्रवीण गाढवे यांनी स्वीकारला ,

शाळेच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक उत्तम भोसले सर्व शिक्षक अधिक्षक,अधिक्षिका, वर्ग चार कर्मचारी यांनी अभिनंदन केले तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास झाडे यांनीही विजेत्या मुलांचे कौतुक केले.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button