50,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत….
प्रतिनिधी: सचिन थोरवे
दिनांक 12/03/2024 रोजी दुपारी 11:30 वाजताच्या सुमारास मौजे नारायणगावचे हद्दीत बँक ऑफ इंडिया शाखा नारायणगाव येथे फिर्यादी नंदाराम उमाजी गाढवे वय 67 वर्ष धंदा शेती राहणार आर्वी तालुका जुन्नर जिल्हा पुणे हेत्यांना मोटरसायकल घ्यावयाचे असल्याने त्यांनी बँक ऑफ इंडिया येथून ५० हजार रुपये रोख रक्कम काढून पँटचे खिशात ठेवली असताना कोणीतरी अज्ञात इसमांनी हात चलाखीने त्यांचे संमतीशिवाय मुद्दाम लबाडीच्या इराद्याने त्यांच्या खिशातील 50 हजार रुपयाची रक्कम चोरी केल्या बद्दल नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता…
सदर घटनेची माहिती मिळताच नारायणगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फूटेज चेक करून दोन संशईत महिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांची नावे 1) सोनिका निरोत्तम सिसोदिया वय 35 वर्ष व्यावसाय कपडे विकणे राहणार गुलखेडी तालुका पाचोर जिल्हा राजगड राज्य मध्य प्रदेश 2) उपासना डॅनी भानेरिया वय 20 वर्ष राहणार कडिया तालुका पाचोर जिल्हा राजगड राज्य मध्य प्रदेश अशी असून त्यांनीच चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांचे कडून चोरीला गेलेले 50,000/- रुपये हस्तगत करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली असून रिमांड कामी मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो. जुन्नर यांचे समक्ष हजर केले असता त्यांना 5 दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली असून अधिक तपास पोलीस हवालदार रमेश काठे हे करीत आहेत
सदरची कामगीरी ही मा.पंकज देशमुख सो, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मा. रमेश चोपडे सो अप्पर पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, मा.रविंद्र चौधर सो, उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग व मा.अविनाश शिळीमकर सो स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे, पोलीस उपनिरीक्षक सनिल धनवे,पोलीस हवालदार रमेश काठे, पोलीस नाईक मंगेश लोखंडे,पोलीस कॉन्स्टेबल शैलेश वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल काळुराम मासाळकर, पोलीस कॉन्स्टेबल संतोष साळुंके,पोलीस कॉन्स्टेबल सत्यम केळकर ,पोलीस कॉन्स्टेबल गंगाधर कोतकर, मपोकॉ शुभांगी दरवडे, सोनाली रघतवान, मपोशी सोनाली गडगे, मापोशी रुपाली रोडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पो.हवा.राजू डेरे, दिनेश साबळे, पोलीस नाईक संदीप वारे, पो.शी. अक्षय नवले यांनी केली आहे.