निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार

निर्वी येथे विविध ठिकाणी ध्वजारोहण उत्साहात साजरे करण्यात आले सकाळी प्रभात फेरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथून काढण्यात आली.अंगणवाडी तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक एकत्रितपणे प्रभात फेरी मध्ये सर्व विद्यार्थ्यांनी तसेच ग्रामस्थ सामील झाले होते त्यानंतर तलाठी कार्यालय मध्ये पोलीस पाटील राजाराम सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत मध्ये सरपंच शोभाताई तरटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच प्राथमिक उपकेंद्र येथे मेजर बंडू आबा सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच श्री गणेश संस्था येथे इन्कम टॅक्स अधिकारी संदीप पवार साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मेजर सोमनाथ सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालयामध्ये इन्कम टॅक्स अधिकारी संदीप पवार साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नंतर राष्ट्रगीत झाले , राज्य गीत झाले, पंचप्राण शपथ घेण्यात आली , प्रभात फेरीमध्ये भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान, हर घर झेंडा घर घर तिरंगा, अशा अनेक घोषणा देण्यात आल्या.यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप घुले सर यांनी आपल्या शाळेची प्रास्ताविक मांडले तसेच तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालयातील मुख्याध्यापक विष्णू करपे सर यांनी आपल्या शाळेचे प्रास्ताविक मांडलेया कार्यक्रमाला इन्कम टॅक्स अधिकारी संदीप पवार साहेब हे अध्यक्षस्थानी होते.अनेक विद्यार्थ्यांची भाषणे झाली. इन्कम टॅक्स अधिकारी संदीप पवार साहेब यांनी विद्यार्थ्यांना 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनाच्या विषयी मोलाचे असे मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी शिक्षक वृंद ग्रामस्थ पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर थोरात सर यांनी केले शेवटी सगळ्यांचे आभार जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप घुले सर यांनी केले.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button