निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार
आलेगाव पागा तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे 15 ऑगस्ट मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी प्रभात फेरी गावातील मुख्य चौकातुन काढण्यात आली अंगणवाडी मराठी शाळा आणि हायस्कूल एकत्रितपणे प्रभात फेरी सर्व विद्यार्थ्यांनी तसेच ग्रामस्थ सामील झाले होते त्यानंतर ग्रामपंचायत मध्ये ध्वजारोहन झाले , यानंतर जि प प्राथमीक शाळा आलेगाव पागा येथे ध्वजारोहण झाले यानंतर भैरवनाथ विद्यालय या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी ध्वजारोहण मनोहर भोसले चेअरमन संभाजी वि का सो सेवा संस्था यांच्या हस्ते करण्यात आले ध्वज पूजन मा सरपंच आप्पासाहेब बेनके यांच्या हस्ते करण्यात आले, नंतर राष्ट्रगीत झाले , राज्य गीत झाले, पंचप्राण शपथ घेण्यात आली , प्रभात फेरीमध्ये भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान, हर घर झेंडा घर घर तिरंगा, अशा अनेक घोषणा देण्यात आल्या , अनेक विद्यार्थ्यांची भाषणे झाली , भाषणामध्ये कु निरंजन रासकर इयत्ता आठवी या विद्यार्थ्यांने आपल्या भाषणामध्ये या देशावर इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य केले आपला देश लुटला यामुळे आपल्या नागरिकांचे खूप हाल झाले तसेच सुखदेव ,राजगुरू भगतसिंग देशसेवकांना देशभक्तांना अभिवादन केले अशा अनेक वीर जवानांनी आपल्या देशासाठी बलिदान दिले तसेच अनेक विद्यार्थ्यांची भाषणे झाली सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला तसेच मनोहर भोसले चेअरमन संभाजी वि का सो सेवा संस्था यांच्या वतीने भाषन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले , याप्रसंगी प्रमुख उपस्थिती मध्ये आप्पासाहेब बेनके मा सरपंच सहकारमहर्षी,सौ छायाताई बेनके संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, प्रा तुकाराम बेनके सर, गरूड सर,विशाल आवचीते पोलिस पाटील,रामदास वाघचौरे मा उपसरपंच, वैभव शिंदे मा ग्रामपंचायत सदस्य,जोगामामा जांबळकर, गोपीनाथ शितोळे उपाध्यक्ष शिक्षक पालक संघ, योगिराज मोरे, अनिकेत बेनके पांडुरंग खराडे,या क्रमाचे सूत्रसंचालन हिंगे सर यांनी केले आभार कुटे सर यांनी मानले अशी माहिती शरदराव रासकर संचालक संभाजी वि का सो सेवा संस्था, अध्यक्ष परिवहन समिती भैरवनाथ उच्च व उच्च माध्यमिक विद्यालय यांनी माहिती दिली आहे.