शुभम वाकचौरे

महावितरण कंपनी शिरूर चे तत्कालीन सहाय्यक अभियंता बी एस इधाते यांच्या बेजबाबदारपणा आणि नियमबाह्य कारभाराविरोधात बहुजन मुक्ती पार्टी चे शिरूर शहर सचिव श्री. सागर बंडू घोलप यांचे दिनांक 02. 01.2024 पासून महावितरण कंपनी शिरूर उपविभाग कार्यालयासमोर *आमरण उपोषण*बांधकाम व्यावसायिक आणि महावितरण चे इधाते यांनी संगनमताने सदनिकाधारकाच्या नावावर परस्पर काढले लाखो रुपयांचे कर्ज.

सदनिकाधारकांच्या रहिवासी पुराव्यासाठी बिल्डरला दिलेले कागदपत्रे वापरून विनामागणी अर्ज, विना रेकॉर्ड दिले वीज कनेक्शन. मात्र ज्याच्या नावावर वीज कनेक्शन तोच आहे.अनभिज्ञ.सदनिकाधारकाच्या नावावर बनावट वीज कनेक्शन देऊन,वीजबिले तयार केले आणि ते विज बिल वापरून 2019 मध्ये बिल्डरने नातेवाईकाच्या नावावर घेतले लाखों रुपयांचे कर्ज!महावितरण चे कार्यकारी अभियंता एस के माने यांनी इधाते यांच्या विरोधात वरीष्ठ कार्यालयाला दिनांक १६ मे २०२३ रोजी लेखी पत्र देऊन कारवाई प्रस्तावित केलेली आहे परंतु महावितरण कंपनीने इधाते यांच्याविरुद्ध आजतागायत कोणतीही कारवाई केली

नाही त्यामुळे व्यथित होऊन बहुजन मुक्ती पार्टी शिरूर शहर सचिव सागर घोलप यांनी दोषी अधिकारी बी एस इधाते यांच्या वर तातडीने कठोर कारवाई व्हावी यासाठी दिनांक ०२ जानेवारी २०२४ पासून महावितरण कंपनी शिरूर उपविभाग कार्यालयासमोर पाबळ फाटा याठिकाणी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button