(‘भोंगा वाजलाय, नेता गाजलाय,’ कवितेने महोत्सवात भरला अनोखा रंग)
जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
ग्रामविकास मंडळ ओतूर संचलित सरस्वती विद्यालय उदापूर येथील सांस्कृतिक महोत्सव व पारितोषिक वितरणात भोंगा वाजलाय,नेता गाजलाय,मित्र वनव्यामध्ये गारख्यासारखा तसेच आई-वडिलांवर आधारित कवी लेखक अनंत राऊत यांनी अप्रतिम कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकून कार्यक्रमात रंग भरला.तसेच छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग,बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले अशा थोर महापुरुषांना अंगीकारले तर कोणताही विद्यार्थी जीवनात अयशस्वी राहणार नाही. त्याचबरोबर आई- वडिलांनी मुलांच्या हातातील मोबाईल हिसकावून पुस्तक सोपवा मग देशाची क्रांती घडेल,असा मोलाचा संदेश दिला. त्याचप्रमाणे आम्ही कुणाचे गुरू यापेक्षा आम्हाला आमचे गुरु भेटले यापेक्षा अविस्मरणीय क्षण कुठलाच नाही,जीवनात संथी सगळ्यांना मिळते,पण त्या संधीओळखायला शिकले पाहिजे,मोबाईल दूर ठेवला तर शिक्षणात व आयुष्यात उंच भरारी घेता येईल, तुम्हाला ज्या ज्या क्षेत्राची आवड असेल त्या त्या क्षेत्रात प्राविण्य मिळवा जोपर्यंत आपण माझं म्हणत नाही तोपर्यंत माझी शाळा,माझे गाव माझा महाराष्ट्र,माझा देश विकासाकडे जाणार नाही,असे प्रतिपादन एन. एस. जी, कमांडो राम शिंदे व पाहुणे हनुमंत शिंद, संतोष शिंदे, प्रविण भोर यांनी व्यक्त केले,
उदापूर गावातील हरपलेले शिक्षणप्रेमी कै,बबनदादा कुलवडे व कै.दिगंबर चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन प्रभाकर शिंदे यांनी करून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली यावेळी सरस्वती विद्यालयाची आदर्श विद्यार्थीनी व रोटरी क्लबची अध्यक्ष कु:-ऋतुजा भोर हिने वेलकम स्पीचने उपस्थित सर्वांनी कौतुक केले त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला स्वागत गीतातून सुरुवात झाली, समारंभाचे अध्यक्ष एन. एस. जी कमांडो राम शिंदे, तर प्रमुख अतिथी प्रवीण भोर,संतोष शिंदे, हनुमंत शिंदे हे होते.
याप्रसंगी उदापुरचे प्रथम नागरिक सचिन आंबडेकर,उपसरपंच जयश्री अमूप, अनिल तांबे,प्रभाकर तांबे,सीताराम डुंबरे,रोहिदास शिंदे,पांडुरंग शिंदे,जी. आर. डुंबरे,शशिकांत शिंदे,जालिंदर शिंदे,सतीश आंबडेकर,विनोद भोर,नितीन घोडेकर,शशिकांत आरोटे,विनायक शिंदे,मोहन वलव्हणकर, बी. एम. शिंदे, प्रकाश कुलवडे, सुनील कुलवडे, राजेंद्र शिंदे, संजय ढमढेरे, उद्धव अमुप, संतोष होनराव, किशोर होनराव, शांताराम बटवाल, राजेंद्र डुंबरे, डॉ. पुष्पलता शिंदे, छाया चौधरी,चैत्राली शिंद उपस्थित होते, साईनाथ भोर यांनी प्रास्ताविक केले. संतोष कांबळे यांनी आभार मानले.
:–ढोलताशांचा गजर–: २९ डिसेंबर रोजी सरस्वतीविद्यालय उदापूरचे वार्षिकस्नेहसंमेलन व पारितोषिकवितरण समारंभ मोठ्याउत्साहात पार पडला,यावेळीपरिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले चौक येथून उपस्थितीत मान्यवरांच्या ढोल- ताशांच्या गजरात झाली.प्रथम श्री गणेश, माता सरस्वती,छत्रपती शिवाजी महाराज,ग्रामदैवतकाळभैरवनाथ, माजी आमदार श्रीकृष्ण तांबे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.