जुन्नर प्रतिनिधी : सचिन थोरवे
दिनांक 24 12 2023 सुरेश भिकू महाकाल राहणार मांदारने तालुका जिल्हा पुणे यांनी त्यांचे 47 हजार रुपये किमतीचे 14 कट्टे अज्ञात इसमानी चोरी करून नेले असल्याबाबत फिर्याद दिल्याने ओतूर पोलीस स्टेशनला गु र नं ६५०/२०२३ भा, द ,वि,का, क ३७९.३४ प्रमाणे अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता दाखल गुण ह्याचा अधिक तपास केला असता सदरचा गुन्हा हा दिलीप रामा जाधव वय 22 वर्षे राहणार पिंपळगाव जोगा तालुका जुन्नर जिल्हा पुणे सध्या राहणार सीतेवाडी ता जुन्नर जि पुणे तुषार बाळू काळे वय 22 वर्ष प्रदीप नाथा काळे वय 31 वर्ष दोघे राहणार मांदारने, साबरवाडी ता जुन्नर जि पुणे यांनी केला असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले असून त्यांच्याकडे अधिक तपास केला असता यातील आरोपींकडून १३,४४०रुपये किमतीचे सोयाबीन तसेच४२,००० रूपे किमतीची होंडा कंपनीची स्प्लेंडर एम एच 14 केजी 32 51 असा एकूण 55 हजार 440 रुपये किमतीच्या मध्यमान जप्त करण्यात आला आहे
सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे साहेब यांनी शेतकऱ्यांनी कष्ट केलेल्या सोयाबीन चोरांना अटक करून न्याय दिल्यामुळे तेथील नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल आपुलकीची भावना निर्माण होत असून शेतकरी समाधान ही व्यक्त करत आहे
सदरची कारवाई मा अंकित गोयल,पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण ,मा मितेश घट्टे अप्पर पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण ,मा रवींद्र चौधर उपविभागीय पोलीस अधिकारी सो जुन्नर विभाग जुन्नर यांचे मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि श्री सचिन कांडगे पो ना जनार्दन सापटे ,पो हवा महेश पठारे, पो ना नदीम तडवी ,पो ना संदीप लांडे यांनी केली आहे .