शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात
कर्तव्यदक्ष आरोग्य पर्यवेक्षिका प्राथमिक आरोग्य केंद्र देवगाव जिल्हा अहमदनगर (१५एप्रिल१९८८ ते ३१ डिसेंबर २०२३ या ३६वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत असलेल्या उषा सुनीलराव काळभोर यांचा सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा दिनांक २९ डिसेंबर २०२३ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोहिनूर मंगल कार्यालय एकविरा चौक रोड सावेडी येथे संपन्न झाला या सेवापूर्ती सोहळ्यासाठी विविध प्रमुख पाहुणे उपस्थित होते यावेळी सेवानिवृत्ती सोहळ्यामध्ये एक आगळावेगळा उपक्रम सादर करण्यात आला.
त्यामध्ये सुखदेव दानवे साहेब यांनी आपल्या सासूबाई सौ.उषा सुनीलराव काळभोर मॅडम यांच्या सेवापुर्ती व कृतज्ञता सोहळ्यानिमित्त विद्यमान आमदार संग्राम जगताप साहेब (विधानसभा सदस्य अहमदनगर शहर) त्याचप्रमाणे मा.पै सुनिल भाऊ भोसले साहेब (उपमहापौर अहमदनगर शहर) यांच्या हस्ते आशिर्वाद ट्रस्ट द्वारा संचलित गुरुकुल वस्तीगृहातील गरीब,निराधार,वंचित दुर्बल घटकातील मुलांच्या संगोपनासाठी ५१ हजार रुपयांचा चेक या सोहळ्यामध्ये काळभोर – दानवे परिवार आणि वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वृंद प्राथमिक आरोग्य यांच्या उपस्थितीत देण्यात आला त्यामूळे काळभोर परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.