शुभम वाकचौरे
बहुजन मुक्ती पार्टी शहर सचिव सागर घोलप यांचे बेमुदत आमरण उपोषण.शिरूर महावितरण कार्यालयाच्या तत्कालीन सहाय्यक अभियंता बी एस इधाते यांनी बांधकाम व्यावसायिक यांना बरोबर घेऊन संगनमताने, बिल्डरकडे जमा असलेली सदनिका धारक यांची व्यक्तिगत कागदपत्रे परस्पर वापरून व रहिवासी पुराव्यासाठी महावितरणचे खोटे वीजबिल तयार करून बँकेकडून बिल्डर्सला लाखो रुपयांचे कर्ज सन 2019 मध्ये मंजूर करून दिले.
सदर प्रकार उघडकीस येऊन सुद्धा महावितरण कार्यालय अश्या भ्रष्ट व बेजबाबदार अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी नाईलाजास्तव उपोषणास बसावे लागत आहे.सदर दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.
उपोषणकर्ते:सागर बंडू घोलप सचिव शिरुर शहर बहुजन मुक्ती पार्टी ,नाथाभाऊ शिवराम पाचर्णे राज्य संयोजक भारतीय बहुजन पालक संघ महाराष्ट्र, फिरोजभाई सय्यद कार्याध्यक्ष पुणे जिल्हाबहुजन मुक्ती पार्टी ,युवराज सोनार शिरूर तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक विभाग, सुदर्शन शिर्के माजी सैनिक.