निर्वी प्रतिनिधी : शकील मनियार

मराठा समाजाने पुकारलेल्या साखळी उपोषण बाबत राज्य सरकार हे गांभीर्याने विचार करत नसून राज्य सरकार फक्त बघायची भूमिका घेत आहे असे दिसत आहे राज्य सरकारने उपोषण करणाऱ्या सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्याबाबत सहानुभूतीने विचार करण्याऐवजी मराठा आंदोलकांवर परिस्थिती चिघळून हिंस प्रवृत्तीने सदरचे आरक्षण मोडीत काढण्याचा प्रयत्न राज्य सरकार करताना दिसत आहे.

सदरचे आंदोलन हिंस मार्गाने वळवुन राज्य सरकार आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करून आंदोलन मोडीस काढण्याचा प्रयत्न करत आहे. तरी सकल मराठा समाजावर राज्य सरकार तर्फे खोटे गुन्हे दाखल केल्यास ॲड.सुमित पोटे आंदोलकांना मोफत कायदेविषयक मदत सर्व प्रकारची कायदेशीर मदत करेल असे या ठिकाणी त्यांनी आंदोलकांना तसे प्रत्यक्ष भेटून पत्र दिले. तसेच मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होऊन आरक्षण देण्यात यावे अशी राज्य सरकारला मागणी त्यांनी यावेळी केली.

तसेच सकल मराठा समाज बांधवांना त्यांनी जाहीर पाठिंबा दिला. अन्याय पीडित आंदोलकांनी अन्याय झाल्यास मोफत कायदेशीर साहाय्यासाठी आपला भ्रमण दूरध्वनी क्रमांक
९६६५१०९७९७/७६०७८३९७९७
या नंबर वर संपर्क साधण्याचे पीडित आंदोलकांना आव्हान केले आहे.आजचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे यावेळी महिला वर्ग उपोषणास बसलेले आहे.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button