जरांगे पाटील यांना निमोणे येथून पाठिंबा.
निर्वी प्रतिनिधी : शकील मनियार
राज्यात बहुतांश ठिकाणी मराठा आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजबांधव एकवटले असून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेले मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी निमोणे (ता. शिरूर) येथे साखळी उपोषण चालू आहे. सकल मराठा समाज बांधवांकडून राजकीय पक्ष नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केले असून त्यांच्या या लढ्याला बळकट करण्यासाठी निमोणे येथील मराठा समाज बांधवांनी एकत्र येऊन मराठा आरक्षण मिळेपर्यंत निमोणे गावात सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना गावात प्रवेश बंद करण्यात आल्याचे फलक लावण्यात आले आहे.साखळी उपोषणाचा हा चौथा दिवस आहे.यावेळी माजी आदर्श सरपंच जिजाताई दुर्गे यांनी एक दिवस अन्नत्याग करून उपोषणाला बसले आहेत यावेळी त्यांनी सांगितले की मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभारला आहे या आंदोलनाला सर्वसामान्य जनता मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहे गावोगावी उपोषण केले जात आहे आरक्षण हे मिळायलाच पाहिजे असे त्यांनी आपले मत व्यक्त केले त्याचबरोबर गोरख जाधव ,संतोष जगताप हे उपोषणाला बसलेले आहे.