निर्वी प्रतिनिधी : शकील मनियार
राज्यात बहुतांश ठिकाणी मराठा आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजबांधव एकवटले असून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेले मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी निर्वी (ता. शिरूर) येथे साखळी उपोषण चालू आहे. सकल मराठा समाज बांधवांकडून राजकीय पक्ष नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे.साखळी उपोषणाचा हा तिसरा दिवस आहे. गुरुवार दि.२/११/२०२३रोजी सकाळी ९:००वाजता पावन दक्षिणमुखी हनुमान मंदीरामध्ये सकल मराठा समाज बांधव निर्वी यांनी रक्तदान शिबीर आयोजित केले असून आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवावा असे आवाहन सकल मराठा समाज बांधव निर्वी यांनी केले आहे.🩸🩸🩸 एक थेंब रक्ताचा प्रामाणिक योद्धांचा🩸🩸🩸