शुभम वाकचौरे

शिरूर येथील बाफना मळा व बाबुराव नगर मधील सांडपाणी प्रश्न गेल्या २० दिवसांपासून अडकून पडला होता. त्यामुळे बाबुराव नगर मधील सगळ्या सोसायटी मध्ये गटाराचे पाणी घुसले होते. पिण्याचे पाण्याचे बोअरवेल मध्ये गटाराचे पाणी गेले होते.

सदर प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूपाचा होता. तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी नागरिकांनी नाथाभाऊ पाचर्णे यांना सांगितले होते. व त्यांना मदत करण्याची विनंती केली होती. सदर प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज गटविकास अधिकारी,तहसीलदार साहेब यांच्यासह शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत व तर्डोबावाडी ग्रामपंचायत प्रशासक व ग्रामसेवक यांना तातडीने आज सकाळी बरोबर घेऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. व तत्काळ आपत्कालीन परिस्थिती असल्याने आजच लगेच. सांडपाणी लाईन व संपूर्ण रस्त्याचे पक्के काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे. संध्याकाळपर्यंत सगळे बाबुराव नगर ,वरपेनगर,बाफना मळा या भागातील तुंबलेले गटार लाईन सुरळीत केले आहे. यावेळी तेथील भागातील जवळपास १५० ते २०० महिला व पुरुष व तरुणांनी साथ दिली. म्हणून हा प्रश्न मार्गी लागला.

बाफना मळा येथे चांगल्या दर्जाची सांडपाणी लाईन व पक्का सिमेंट रस्ता ४५ दिवसात बनवून देण्यासाठी. गटविकास अधिकारी यांनी लेखी पत्र दिले आहे. त्या भागातील सर्व नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

गटर लाईन साठी रस्ता उखडला जात. असून सदरील रस्त्याचे कामासाठी निधी प्राधान्यक्रमाने ग्रामपंचायतनिधी व इतर निधीमधुन उपलब्ध करुन देण्यात यावा. सदरील काम जनतेच्या आरोग्याशी निगडीत असल्यामुळे याबाबत हयगयअथवा टाळाटाळ होणार नाही याबाबत दक्षता घेणेत यावी. सदरील गटर लाईन व रस्त्याचे काम ग्रामपंचायत तर्डोबाचीवाडी हद्दीत करावयाचे असून लवकरात लवकर हा प्रश्न सोडवला गेला पाहिजे. असा प्रश्न नाथाभाऊ पाचर्णे यांनी उपस्थित केला आहे.- —- नाथाभाऊ शिवराम पाचर्णे

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button