जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर

शिक्षण विभाग पंचायत समिती जुन्नर आणि अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या वतीने समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल बेल्हे बांगरवाडी येथे नुकतेच जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय शैक्षणिक साधन निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन जुन्नर तालुका गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीण ताजणे व समर्थ गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे,क्रीडा संचालक एचपी नरसुडे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर ,जुन्नर तालुका गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीण ताजने,खजिनदार व्यंकट मुंढे तसेच जुन्नर तालुक्यातून ३० विज्ञान व गणित शिक्षक या कार्य- शाळेत सहभागी झाले होते.अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन च्या अन्वेशन प्रोजेक्ट चे समन्वयक राजेंद्र औटी,अगस्त्या वर्चुअल स्कूल समन्वयक पांडुरंग जाधव,अगस्त्या वॉलेंटियर कार्यक्रम समन्वयक सुमित मुरूमकर हे तज्ञ मार्गदर्शक म्हणून या कार्यशाळेत उपस्थित होते. जुन्नर तालुक्यातून ३० विद्यालयातील विज्ञान व गणित शिक्षक या उपक्रमासाठी सहभागी झाले होते.विज्ञान व गणितातील संकल्पना समजण्यासाठी वैज्ञानिक व गणितीय प्रतिकृती तयार करण्याचे तंत्र व मंत्र प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशनच्या च्या तज्ञ मार्गदर्शकांनी उपस्थित शिक्षकांना प्रशिक्षण दिले,कागदाची होडी तयार करून होडीच्या साह्याने भौमितिक आकृत्या त्यांचे गुणधर्म व पायथागोरसचे प्रमेय समजावून सांगितले.स्ट्रॉ चा वापर करून स्थितिज विद्युत ऊर्जा,प्रभाराचे वहन फुग्यांचा वापर करून वातावरणीय दाब,हवेचे प्रसारण कसे होते या संकल्पना समजून सांगितल्या. अशाप्रकारे विविध विज्ञानातील व गणितातील अवघड संकल्पना विद्यार्थ्यांसाठी कशा सोप्या करून सांगता येईल व कशा प्रकारे कृतीयुक्त शिक्षणप्रणाली चा सहभाग वाढवता येईल हे या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांना सांगण्यात आले.विज्ञान व गणित विषयामध्ये विद्यार्थ्यांना गोडी वाटावी यासाठी हे विषय रंजक पद्धतीने शिकवावेत.अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक साधनांचा व प्रतिकृतींचा वापर करून क्लिष्ट संकल्पना सोप्या केल्या जातात याचा फायदा शिक्षकांच्या माध्यमातून नक्कीच विद्यार्थ्यांना होईल असे यावेळी संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके म्हणाले.कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांनी तर आभार समर्थ गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी मानले.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button