प्रतिनिधी : जिजाबाई थिटे

वाघेश्वर विद्याधाम प्रशाला मांडवगण फराटा येथील ज्येष्ठ शिक्षक मल्हारी उबाळे यांना शिरूर तालुका मुख्याध्यापक संघ व पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या वतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे संचालक प्राचार्य तुकाराम बेनके यांनी दिली.मल्हारी उबाळे हे तालुक्यातील ज्येष्ठ शिक्षक असून क्रीडाक्षेत्र तसेच पर्यावरणामध्ये त्यांनी काम केले आहे. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची तालुक्यामध्ये ख्याती आहे त्यांचा कार्याचा गौरव म्हणून शिरूर तालुका मुख्याध्यापक संघ व पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्यावतीने शनिवार दि २१ ऑक्टोबर रोजी शिक्षक आमदार जयंतराव आसगावकर यांच्या हस्ते उबाळे सरांना सन्मानीत करण्यात येणार आहे कार्यक्रमाला शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के,पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर,सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे उपस्थित राहणार आहेत.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button