जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या मासिक सभेत सोमवारी ता:- १५ ऑक्टो रोजी सत्ताधारी व विरोधी गटाच्या संचालकात वादावादी झाली यात फ्रिस्टाईल लाथाबुक्क्यांचा प्रसाद मिळाला असल्याने एकमेकांच्या विरुद्ध भांडण्याचे पर्यावसान पोलिसांकडे परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात झाल्या.सत्ताधारी गटाकडून दोन,तर विरोधी गटाकडून एक,अशा तीन तक्रारी दाखल झाल्याने या प्रकाराची शिक्षक वर्गात जोरदार चर्चा सुरू आहे.
याप्रकरणी एका संचालक महिलेने विरोधी गटाच्या पुरुष संचालकाच्या विरोधात दिलेल्या विनयभंग व मारहाण झाली तक्रारीत मोबाईलमध्ये चित्रण केल्याची विचारणा केली असता असल्याचा आरोप पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत केला आहे. यावेळी त्यांच्यातील भांडणे सोडविणाऱ्या सत्ताधारी गटाच्या संचालकाने आपणास जातिवाचक बोलून लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ करून दमदाटी केली.भांडणांमध्ये गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून नेली व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे विरोधी गटाच्या दोन सदस्यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
संचालकाने दरम्यान,विरोधी सत्ताधारी गटाच्या सभेस उपस्थित असणारे संचालक व कर्मचारी, अशा १९ जणांच्या विरोधात तक्रार दिली आहे.यात कर्ज वाटप नियमबाह्य पद्धतीने झाल्याचे सांगत असताना बोलण्यास विरोध केला. तसेच, जातिवाचक बोलून अपमानित केले. लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून नेली. तसेच, जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी विनयभंग, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार, तसेच अन्य कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.