प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व श्री छत्रपती संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जातेगाव बुद्रुक ता. शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने ११ व १२ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या जिल्ह्यातून मुला मुलींच्या १४ १७ व १९ वयोगटातील ७८ संघानी सहभाग नोंदवला तर एकूण ६ संघांची विभागीय पातळीवर निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य रामदास थिटे यांनी दिली. यावेळी संस्थेचे मार्गदर्शक व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मा.आयुक्त कांतीलाल उमाप उद्घाटनपर भाषणात मार्गदर्शन करताना म्हणाले खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे खेळामुळे शारीरिक क्षमता व बौद्धिक विकास होतो तसेच मुलांच्या बुद्धीशक्तीमध्ये वाढ होते विविध खेळ हे व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी माध्यम असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.शिरूर तालुक्याच्या इतिहासात २५ वर्षानंतर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा पार पडत आहेत हा तालुक्याचा व जातेगावचा विशेष गौरव आहे मुलांनी खेळाद्वारे राज्य व राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक संपादन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन संस्थेचे सचिव प्रकाश पवार यांनी सांगितले जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरण व समारोपप्रसंगी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी देखील खेळाडूंना मार्गदर्शन केले शरीर आणि मन यांचा सहयोग घडवणारा आनंद म्हणजे खेळ खेळ हा मैदानावरचा परमार्थ आहे विद्यार्थ्यांनी तो विवेक पूर्ण समजून घ्यावा खेळ ही स्पर्धा आहे इर्षा नव्हे क्रीडा विवेक ही समाजाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रमाला तालुका क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकाते,युवा नेते राजेंद्र गावडे,संचालक सुरेश मोरे, प्राचार्य
डॉ ललितकुमार इंगवले,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणेचे उपाध्यक्ष प्रा जितेंद्रकुमार थिटे, शिरूर तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष शरद दुर्गे, खेड तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष नितीन वरकड,शिरूर तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष झेड.एस.पवार,क्रीडा संघटनेचे मा. अध्यक्ष दादासाहेब उदमले, क्रीडा संघटनेचे सचिव मनोज धिवार,राजकुमार राऊत,संभाजी काळे,सुनील जाधव,ॲथलेटिक संघटनेचे अध्यक्ष कैलासराव खंडागळे,किरण झुरंगे सुनील जाधव, मल्हारी उबाळे,हलगुंडे सर,वडगुले सर, कंठाळी सर,शामराव चौधरी ,संतोष क्षीरसागर तसेच पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पंच व क्रीडा शिक्षक,क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण स्पर्धेचे नियोजन आदर्श क्रीडा शिक्षक कांतीलाल धुमाळ,प्रमोद काळे,अशोक शिंदे यांनी केले.
या दोन दिवशीय स्पर्धेमध्ये चुरशीने खेळलेल्या अनेक संघानी विजय मिळवला १४ वर्षाखालील मुले
वालचंद विद्यालय कळंब प्रथम
अम्रिता विद्यालय नसरापूर द्वितीय
कारेश्वर इंग्लिश स्कूल कारेगाव तृतीय
१४ वर्षाखालील मुली
माध्यमिक विद्यालय गुंजाळवाडी प्रथम
संत तुकाराम विद्यालय डोरलेवाडी द्वितीय भैरवनाथ विद्यामंदिर खोर तृतीय
१७ वर्षाखालील मुले
श्री रोकडोबानाथ विद्यालय भांडगाव प्रथम
शारदाबाई पवार निकेतन बारामती द्वितीय वालचंद विद्यालय कळंब तृतीय
१७ वर्षाखालील मुली
एल.जी.बनसोडे विद्यालय पळसदेव प्रथम रोकडोबानाथ विद्यालय भांडगाव द्वितीय जनहित प्रतिष्ठानचे विद्यालय बारामती तृतीय
१९ वर्षाखालील मुले
एल.जी बनसोडे विद्यालय पळसदेव प्रथम गोपीनाथ विद्यालय वरवंड द्वितीय
विद्या प्रतिष्ठान बारामती तृतीय
१९ वर्षाखालील मुली
जे.व्ही.एम ज्युनिअर कॉलेज आंबेगावप्रथम एन.ई.एसहायस्कूल निमसाखर द्वितीय
संत गाडगेबाबा विद्यालय पिंपळगाव जोगा तृतीय
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संतोष डफळ,रमेश जाधव,विजय वर्पे ,संगीता ढवळे ,सुनीता उमाप तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य रामदास थिटे यांनी सूत्रसंचालन गणेश बांगर तर आभार कांतीलाल धुमाळ यांनी मानले.