जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
श्री अष्टविनायकातील लेण्यांचे स्थान असलेल्या श्रीक्षेत्र लेण्याद्री ता:-जुन्नर येथे सोमवार दि:-०२ ऑक्टोबर रोजी संकष्टी चतुर्थीनिमित् 'श्री गिरीजात्मज' गणपतीचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले.पहाटे पासून दिवसभर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.यावेळी श्री क्षेत्र लेण्याद्री परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.यानिमित्ताने श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनी दिली.
श्री लेण्याद्री गणपती देवस्थानचे वतीने पहाटे ५.३० वाजता देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई,उपाध्यक्ष संजय ढेकणे,विश्वस्त सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापुजा करण्यात आली.त्यानंतर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री गिरिजात्मज गणेशाच्या मूर्तीस व मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.मंदिरात दिवसात तीन वेळा आरती केली जाते पैकी सायंकाळी ६ वाजता महाआरती महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व दैनिक समर्थ गावकरीचे मुख्य संपादक डॉ.विश्वासराव आरोटे यांचे शुभहस्ते करण्यात आली.यावेळी त्यांचे सोबत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र भोर,दैनिक समर्थ गावकरीचे महाव्यवस्थापक संजय फुलसुंदर,पुणे जिल्हा संपर्क प्रमुख मनोहर हिंगणे उपस्थित होते.
यावेळी लेण्याद्री देवस्थान ट्रस्टच्या वतीने डॉ.विश्वासराव आरोटे यांचा तसेच उपस्थित मान्य- वरांचा बाप्पाची शाल,श्रीफळ व गिरिजात्मकाची प्रतिमा सचिव रोहिदास बिडवई यांचे शुभहस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी डॉ.विश्वासराव आरोटे यांनी देवस्थानच्या विकास कामांचे व पुरविण्यात येणाऱ्या सेवासुविधांचे कौतुक केले त्याचबरोबर आज संकष्टी चतुर्थीच्या शुभमहूर्तावर गिरिजात्मक बाप्पाच्या आरतीचा मान म्हणजे आमचे आहोभाग्य आणि आपल्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांना अन्नदान (पंगत) करण्यात येणार असल्याचे सांगितले.
संकष्टी चतुर्थी निमित्ताने श्रीक्षेत्र लेण्याद्री येथे दिवसभर विविध धार्मिक विधी करण्यात आले.तसेच भाविकांना देवस्थान ट्रस्ट मार्फत विविध सेवा पुरवण्यात आल्या.सलग पाच दिवस सुट्ट्यांमुळे भाविकांची व पर्यटकांची दिवसभर मोठ्या प्रमाणात गर्दी होती.भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे याकरीता गर्दीचे नियोजन देवस्थानच्यावतीने केले होते. सायंकाळी श्री मुक्ताई प्रासादिक भजनी मंडळ शिवेचीवाडी यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम झाला