जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर मध्ये वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवायोजना विभाग,वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र विभाग तसेच वन विभाग जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह निमित्त विशेष व्याख्यान तसेच वन्यजीवांवर आधारित पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभय खंडागळे यांनी दिली.
आपल्या मनोगतामध्ये वैभव काकडे यांनी असे मत व्यक्त केले की,पृथ्वीवर माणसाचे अस्तित्व सर्व प्राणिमात्रामुळे अबाधित आहे कारण पर्यावरणाचे संतुलित ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य वन्यजीव अप्रत्यक्ष- पणे करीत असतात.वन्यजीव आहेत म्हणूनच अन्न- साखळी अबाधित आहे व अन्नसाखळी अबाधित असल्यामुळेच पर्यावरण संतुलन होत असते. पर्यावरण व वन्यजीव संरक्षणासाठी लोकांचासहभाग आवश्यक आहे लोकांनी त्यासाठी जागरूक राहून वन्यजीवांना अभय दिले पाहिजे असेही मत ओतूर वनपरक्षेत्रित अधिकारी श्री वैभव काकडे यांनी व्यक्त केले
याचबरोबर माणिक डोह बिबट निवारा केंद्राचे व्यवस्थापक महेंद्र ढोरे यांनी आपल्या मनोगत मध्ये मानव बिबट संघर्ष व सहजीवन या विषयावरती मार्ग- दर्शन केले यामध्ये त्यांनी बिबट जीवनचक्र,त्याच्या सवयी,भक्ष,प्रज्योत्पादन इत्यादी गोष्टी विशद केल्या याबरोबरच बिबट समस्यांची मूळ कारणे काय आहेत व मानव बिबट सहजीवनासाठी आपण आपले वर्तन कसे ठेवावे याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. याचबरोबर त्यांनी असेही आवाहन केले की आपल्या परिसरामध्ये बिबट पिल्ले आढळल्यास त्यांना न हाताळता तात्काळ वन विभागास संपर्क करावा जेणे- करून त्यांचे संरक्षण केल्या जाऊ शकते.
सदर कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अभय खंडागळे यांनी यांनीही मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमासाठी वैभव काकडे:- वनपरिक्षेत्रीत अधिकारी ओतूर, महेंद्र ढोरे:- व्यवस्थापक बिबट निवारा केंद्र माणिकडोह,वनरक्षक सुधाकर गीते,सुदाम राठोड,बेल्हे आदी मान्यवर तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ व्ही एम शिंदे,डॉ बी एम शिंदे,डॉ व्ही डी जाधव,प्रा सागर पारधी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय राहंगडाले यांनी केले तर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम आधिकारी अमोल बिबे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन निलेश काळे यांनी व्यक्त केले