शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर दरम्यान देशभरात स्वच्छता अभियान राबवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते या आव्हानास प्रतिसाद देतया उपक्रमासाठी गुनाट येथे रविवार (दि.१) रोजी सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांनी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते याला प्रतिसाद देत ग्रामपंचायत प्रशासन, सरपंच, उपसरपंच व इतर सदस्य, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, श्री दत्त माध्यमिक विद्यालय, अंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीस, गाव कामगार तलाठी ,कर्मचारी, सोसायटी व शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थांनी उत्तम प्रतिसाद देत सार्वजनिक ठिकाणे, मंदीर परिसर, स्वच्छ करून ‘एक तारीख एक तास’ श्रमदान करून स्वच्छता केली तसेच येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व श्री दत्त माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी शाळेतून स्वच्छतेसंदर्भात प्रभात फेरी काढून परिसर स्वच्छ केला. स्वच्छता विषयावर घोषवाक्य , पोस्टर , कविता लेखन, रांगोळी आदी उपक्रम राबविण्यात आले. व या उपक्रमातून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देऊन स्वच्छ्ता हीच ईश्वर सेवा असे या मोहिमअंतर्गत सागण्यात आले.