जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर
महाराष्ट्र राज्य शासनाने एस.टी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील सवलती धनगर समाजाला देण्यात येतील असे त्यांच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिल्याने आदिवासी समाज चांगलाच आक्रमक झाला असून या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरला आहे जुन्नर तालुक्याच्या उत्तरेकडील बनकरफाटा येथे आदिवासी वादळ देवराम लांडे यांच्या नेतृत्वाखाली समाजाने एल्गार करून हाती दंडुका घेऊन नगर कल्याण महामार्ग अडवून चक्काजाम केला व सरकारच्या या चुकीच्या धोरणाचा निषेध करून आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.आमच्या आरक्षणाला हाथ लावला तर हाथ कलम केले जातील असा इशाराही आदिवासी समाजाच्या वतीने देण्यात आला.
शनिवार दि:-३० सप्टेंबर रोजी सकाळी ०८ वाजता बनकरफाटा येथे आदिवासी समाजाच्या नागरिकांनी गर्दी केली होती आदिवासींच्या हक्काच्या आरक्षणामध्ये इतर कोणाचाही समावेश करू नये त्यांना त्यांचे आरक्षण वेगळ्या पद्धतीने द्यावे यासाठी आदिवासी समाजाने हाती दंडुका घेऊन रास्तारोको आंदोलन केले.यावेळी समाजातील विविध पक्षातील नेते आदिवासी बांधवांसाठी राजकारण बाजूला ठेवून आम्ही आमच्या समाजासाठी सदैव एकत्रच असणार आहे.आंदोलनामुळे तिन्ही बाजूच्या मार्गावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलन कर्त्यांची समजूत काढून वाहतूक सुरळीत केली.हे आंदोलन सुरळीत पार पाडण्यासाठी ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीसनिरीक्षक सचिन कांडगे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी आदिवासी नेते देवराम लांडे,भीमा मुठे,विनोद केदारी,गेनू उंडे,दत्ता गवारी,पंडित मेमाणे, मारुती वायळ,काळू शेळकंदे,मंगल उंडे,सुनीता बोराडे संजय कुदळ,राजु मुठे, विजय डामसे,देवराम मुंढे, विक्रम मुंढे,धोंडू मराडे,राजू कारभळ,शंकर घोडे, अमोल लांडे,कैलास गारे,सुरेश घोडे,गोविंद साबळे, शंकर माळी,विठ्ठल कवटे,ठमा कवटे,काळू माळी,सोनाबाई दाभाडे,हौसाबाई काठे योगिता दाभाडे,यांसह अनेक आदिवासी महिला व तरुणमोठ्या संख्येने उपस्थित होते.”””धनगर समाजाला आरक्षण देऊ नये असे आम्ही म्हणत नाही परंतु आमच्या आरक्षणात त्यांना सहभागी करून घेऊ नये यावर आम्ही ठाम आहोत प्रत्येक वेळी आदिवासी समाजावर अन्याय झाला आहे आता आमच्या हक्काच्या आरक्षणामध्ये इतर कुणालाही येऊ देणार नाही वेळ पडली तर विधानभवनावर आदिवासी मोर्चा घेऊन जाणार, यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडणार असून जुन्नर तालुक्यात शरद पवार येणार आहेत. त्यांच्याकडे देखील आम्ही निवेदन देणार आहोत माझ्या समाजासाठी प्राण गेले तटी बेहत्तर; परंतु मीमागे हटणार नाही.यावेळी फक्त नगर-कल्याण महामार्ग थोड्यावेळापुरता बंद केला, परंतु भविष्यात सरकारने आमच्या आदिवासी समाजाकडे लक्ष नाही दिले तर महाराष्ट्राची राजधानी मुंबईला जाणाऱ्या माळशेज, कसारा,खंडाळा या घाटांमध्ये चक्काजाम आंदोलन करून महामार्ग बंद करण्यात येईल-:देवराम लांडे, मा:-अध्यक्ष, पुणे जिल्हा परिषद:-