जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर

जुन्नर : राजूर (ता. जुन्नर) येथील आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये शुक्रवार दि:- २९ सप्टेंबर रोजी जागतिक हृदय रोग दिन साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमामध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.वर्षा गुंजाळ, विघ्नहर्ता मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, नारायणगाव येथील हृदय रोग तज्ञ डॉ.आशुतोष बोळिज व डॉ. दयानंद गायकवाड, जुन्नर यांनी मार्गदर्शन केले.

सदर शिबिराचे समन्वयक डॉ.गोसावी यांनी देखील मार्गदर्शन व उपचार केले.सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी आरोग्य वर्धीनी केंद्र,राजूर व तालुक्यातील इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.सदर शिबिरात १०० रुग्णांची हृदय रोग, रक्तदाब व रक्त तपासणी करण्यात आली. तसेच रक्तदान शिबिराचे देखील यशस्वी आयोजन करण्यात आले. शिबिराकरीता लुपिन फाऊंडेशन व ग्रामपंचायत,राजूर,सरपंच श्रीमती मुंढे यांचे सहकार्य लाभले.यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button